महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

पाचोरा
आज दिनांक ११ जून २०२२ रोजी, महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळाची सहविचार सभा पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाली या सभे मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य विकास मंडळाचे अध्यक्ष शांतीलाल जी नैनाव हे होते तर प्रमुख अतिथी पाचोरा शहर समाज कमिटी अध्यक्ष तथा सल्लागार समितीचे प्रमुख सदस्य डॉ. आर बी तेली हे होते.

रामदेव लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेत स्नेहभोजनानंतर बैठकीला सुरुवात झाली. अतिथी देवोभव या उक्तीप्रमाणे सुरुवातीला आलेल्या सर्व महाराष्ट्र कमिटीच्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.यांनतर सभेस सुरुवात झाली. पाचोरा तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या बांधवांचा गौरव करण्यात आला. यामध्ये

१) पिंपळगाव हरे. येथील आदर्श शिक्षक व महाराष्ट्र कमिटीचे सहकोषाध्यक्ष संजय झेरवाल सर यांची पाचोरा तालुका भाजपा शिक्षक संघटना अध्यक्ष पदीनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला

२) खडकदेवळा येथील पोलिस पाटील तुकाराम मंगरुळे (तेली) यांचा मुलगा व सून दोघंही डॉक्टर झाल्याने त्यांचे आदरतिथ्य करण्यात आले.

३) कुऱ्हाड येथील मेडिकल व्यावसायिक संजय तेली यांनी आपले दोघ मुल डॉक्टर घडविले व सूनबाई देखील डॉक्टर झाल्या त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला

४) पाचोरा येथील शिक्षक व व्यावसायिक तसेच पाचोरा कमिटीने कार्याध्यक्ष सुनील परदेशी यांचा मुलगा चांगल्या गुणांनी इयत्ता १२ वी ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

५) पाचोरा येथील अग्रेसर असलेली शैक्षणिक संस्था झेरवाल अकॅडेमी यंदा देखील यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता १२ वी चा जबरदस्त निकाल लावण्यात यशस्वी ठरल्याने झेरवाल अकॅडेमीचे संचालक व पाचोरा कमिटीने चे उपाध्यक्ष प्रा.अमोल प्रभाकर झेरवाल यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर महाराष्ट्र कमिटीचे सचिव राजेंद्र ढाकरे सर यांनी मागील सहविचार सभेचे मुद्धे तसेच विविध विषयांचा आढावा दिला.सभेच्या आयोजनाचा मुद्द्यांसह पर्यावरण ,नियोजन,रक्षण व संवर्धन अशा विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली समाज विकासात्मक व एकात्मता अशा महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या मध्ये

1)वसतिगृह देखरेख जबाबदारी (हॉस्टेल रिस्पॉन्सिबिलिटी इन्चार्ज चीफ ऑफिसर) प्रसिद्धीप्रमुख सन्माननीय चुन्‍नीलालजी उदणे साहेब यांच्याकडे देण्यात आली त्यांना औरंगाबादचे वरिष्ठ कमिटीचे उपाध्यक्ष सौ अलकाताई लहीवाल,सहसचिव सन्माननीय श्री राजेन्द्र भाऊ चौधरी,संस्थपक अध्यक्ष संभाजीनगर सन्माननीय मच्छिंद्रनाथजी मंगरुळे साहेब हे सहकार्य करतील.

2)ज्या गावांची कुटुंब माहिती संकलित करणे आद्याप बाकी आहे त्यांनी 20 तारखेपर्यंत द्यायची आहे यात स्थानिक कमिटी ने लक्ष घालावे.

3)विविध क्षेत्रातील समाजातील गुणवंत सत्कार त्या त्या गावाच्या कमिटीने घरी जाऊन त्यांचेआदरतिथ्य करावे.पुढे सोईनुसार सर्वांचा गुणवंत सत्कार तसेच इतर सोहळे साजरे करावे.,वर्षातून किमान3/4 शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कमिटीने घावे.

4)वृक्ष संवर्धन व पर्यावरण जतन यासाठी प्रत्येक गावाच्या कुटुंबाने एक 1 ते 15 जुलै या दरम्यान पर्यावरण पंधरवाडा साजरा करून पर्यावरण रक्षण करायचे त्यासाठी प्रतेक कुटुंबाने 1 झाड लावायचे आहे त्यांना स्थानिक कमिटीने प्रोत्साहित करावे. ती आपली नैतिक जबाबदारी आहे

5)समाजामध्ये व्यसनाधीनता, कुटुंबकलह व इतर वाद असतील तर स्थानिक कमिटीने लक्ष घालून ते शांततेत सोडवावे.

इत्यादी निर्णय घेण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पद्मवांशिय तेली विकास समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष शिवा झलवार, सचिव राजेंद्र ढाकरे, सहकार्याध्यक्ष प्रकाश दसरे, कोषाध्यक्ष दिपक मंडावरे, सहकोषध्यक्ष संजय झेरवाल, युवा उपाध्यक्ष संदीप ढाकरे, प्रसिद्धी प्रमुख चुंनीलाल उदने, वरिष्ठ सदस्य संजय तेली, भास्कर तेली, प्रा अमोल झेरवाल, प्रमुख अतिथी तुकाराम तेली, राहुल तेली, संदीप मंडावरे सर पाचोरा कमिटीने कार्याध्यक्ष सुनील परदेशी सर, सचिव हेमंत तेली, सदस्य किरण तेली, प्रवीण तेली इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पाचोरा कमिटीने मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील परदेशी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ शांतीलाल तेली यांनी केले. सहविचार सभेला रामदेव लान्स चां निसर्गरम्य वातावरण व उत्कृष्ट जेवणाची मेजवानी मुळे चार चाँद लागले आणि सहविचार सभेचा हेतू सफल झाला.