सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,अमळनेर शाखेत भारतीय प्रजासत्ताक दिवस उत्साहात संपन्न,,,,,,,
अमळनेर,
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापनदिन सेंट्रल बँक शाखेच्या अमळनेर शाखेत उत्साहात साजरा करण्यात आला. शाखा व्यवस्थापक श्री.रमण कवडे यांनी ध्वजारोहण केले. उपस्थित बँक कर्मचारी, अधिकारी यांनी सामुहिक राष्ट्रगीत म्हटले.तसेच बँकेकडून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा सामुहिक संकल्प केला. बँक कर्मचारी अधिकारी सर्वश्री सुनील सोन्हिया,
दया कृष्ण सनवाल यांनी तसेच स्थानिक प्रसिद्ध गायक संजय अहिरे यांनी देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण उत्साही, राष्ट्रभक्तिमय केले. कार्यक्रमाचे शेवटी श्री. ज्ञानेश्वर निकम यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसेच सुरक्षा विमा योजनेचे अंमलबजावणी उत्कृष्ट रित्या केल्या बद्दल सन्मानीत करण्यात आले.
बँक कर्मचारी श्री. अशोक शर्मा यांनी उपस्थित, निमंत्रित यांचे आभार मानले. या प्रसंगी सर्वश्री अशोक राणे, सुनील पाटील, किशोर धनगर, उमेश पाटील, निकम व अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.