हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात हजारो महिलांचा सहभाग; संगीतमय मेजवाणीसह विविध खेळांचा महिलांनी लुटला मनमुराद आनंद

हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात हजारो महिलांचा सहभाग; संगीतमय मेजवाणीसह विविध खेळांचा महिलांनी लुटला मनमुराद आनंद

आ.किशोरअप्पा पाटील फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

पाचोरा( वार्ताहर) दि,२६
मकर संक्रांतीचे औचित्य साधत पाचोऱ्यात आमदार किशोर अप्पा पाटील फाउंडेशनच्या वतीने माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील व बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने महिला भगिनींसाठी ‘मान हळदी कुंकुवाच्या सन्मान सौभाग्याचा ‘अशी टॅग लाइन वापरत हळदी कुंकवाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बुधवारी संध्याकाळी सहा वाजता चिंतामणी कॉलनी भागातील शिवालय या आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या निवासस्थाना शेजारील शिवतीर्थ मैदानात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील,युवानेता सुमीत पाटील, बाळासाहेबांच्या
शिवसेनेचे शहर प्रमुख किशोर बारावकर,प्रविण ब्राह्मणे,भडगाव येथील महेंद्र ततार, मयुरी बिलदीकर, उर्वशी गोहिल, महानंदा पाटील, उर्मिला शेळके ,किरण पाटील ,सीमा महाजन ,श्वेता ततार यांचेसह युवासेनेचे समाधान पाटील,नितीन चौधरी, मोहित राजपूत ,भूषण पाटील, बंडू सोनार यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी औरंगाबाद येथील संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात इटीव्ही गौरव महाराष्ट्राचा व झीयुवा संगीत संग्राम महाविजेता तथा डार्लिंग आणि बॉईज 3 या मराठी चित्रपटांचा पार्श्वगायक रवींद्र खोमणे व गायीका लक्ष्मी जी यांच्या सुरेल गायनाने महिलांमध्ये उत्साह संचारला तर रेडिओ जॉकी अभय यांच्या खुमासदार सुत्रसंचलनाने वेळोवेळी हास्याची लकीरे उमटली. यावेळी उपस्थित महिलांना हळदी कुंकुवासह प्रत्यक सहभागी महिलेला आकर्षक भेट वस्तू देण्यात आली तर उपस्थितांपैकी गायनाच्या खेळात प्रथम आलेल्या दीपाली संदीप येवले या महिला भगिनीला नितीन चौधरी यांचे वतीने ११ हजार रुपये किमतीचे वॉटर फिल्टर भेट देण्यात आले तर द्वितीय तृतीय व चतुर्थ आलेल्या स्पर्धकांना पैठणी साडी भेट देण्यात आली तसेच विविध खेळांच्या माध्यमातून विजयी ठरलेल्या महिलांना विविध आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.
यावेळी सुनीता पाटील यांनी कार्यक्रमा मागील भूमिका विषद केली.महिलांच्या प्रचंड उपस्थिती विश्वासाबद्दल प्रथम त्यांनी आभार व्यक्त करत कोविड काळात संपूर्ण आमदार किशोर अप्पा पाटील यांचे सह संपूर्ण कुटुंब बाधित असतांना देखील आम्ही जनसेवेचा वसा न सोडता सर्वसामान्य जनतेच्या मदतीला उभे राहिल्याचा उल्लेख करतांना त्या भावूक झाल्या होत्या.
अनेक कार्यक्रम वेळोवेळी महिला भगिनींसाठी आम्ही घेत असतो त्याचाच एक भाग म्हणून यंदाही महिलांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करता आला. घरातील विविध जबाबदाऱ्यांमुळे महिलांना घराबाहेर पडणे फारसे शक्य होत नाही तसेच कोरोना मुळे देखील अनेक प्रतिबंध असल्याने कोणतेही कार्यक्रम जाहीर स्वरूपाचे होऊ शकले नव्हते म्हणून भडगाव व पाचोरा शहरात आमदार किशोरअप्पा पाटील फाउंडेशनच्या वतीने भव्य स्वरूपात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

.