सहकार महर्षी स्व.दादापाटील राजळे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त स्मृती व्याख्यानमालेचे शानदार उद्घाटन

हकार महर्षी स्व.दादापाटील राजळे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त स्मृती व्याख्यानमालेचे शानदार उद्घाटन

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी स्व.दादापाटील राजळे यांच्या १०३ व्या जयंती निमित्ताने राजळे महाविद्यालयात स्मृती व्याख्यानमालेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पराग काळकर हे होते.त्यांनी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व ज्ञानाधारीत समाज निर्मिती” या विषयावर व्याख्यान दिले.प्रारंभी स्व.दादापाटील राजळे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन समाधीवर पुष्पांजली अर्पण करून राजळे महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील विस्तारित इमारत, व्यायाम शाळा, मिडिया पाॅडकास्ट सेंटर चे उद्घाटन करण्यात आले.नंतर व्यासपीठावर स्व.दादापाटील राजळे आणि त्यांचे नातू माजी आमदार स्व.राजीवजी राजळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने या स्म्रृती व्याख्यान माला सोहळ्याची सुरुवात झाली.प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ टेमकर सर यांनी प्रास्ताविक केले.तर आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर मंडळींना सन्मानित करण्यात आले. आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्वागत पर भाषणात आपले महाविद्यालया बाबदचे विचार व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी राहुल राजळे,रामकिसन काकडे,उद्धवराव वाघ,सुभाष बुधवंत, काकासाहेब शिंदे,डॉ जी पी ढाकणे,प्राचार्य दौंड सर,चौरे सर, एकनाथ आटकर, भास्कर गोरे, सोपानराव तुपे,लांडगे सर,फलके सर,आर जे महाजन, अशोक काळे, सुनिल पानखडे,शांताराम खनगे, विक्रम राजळे , विशाल बोरूडे, सचिन वायकर, सोमनाथ अकोलकर, उमेश तिजोरे ,राजकुमार घुले सर,जनार्दन नेहुल, गंगाधर लवांडे सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन राजेंद्र इंगळे यांनी केले.