श्री.गो.से. हायस्कूल ,पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी “बाल संसद” या अभियानात घेतला भाग

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत श्री.गो.से. हायस्कूल ,पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी “बाल संसद” या अभियानात भाग घेतला.

पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित. श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा. येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी बाल संसद सभेचे आयोजन केले होते. संकुल समन्वयक कुमार राजेश रंजन यांनी बाल संसद प्रशिक्षण मध्ये सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्याचा विकास करणे,नेतृत्व गुण, निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे, विद्यालयातील घडामोडींमध्ये सहभाग घेणे, विद्यालय आनंददायी, सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी बाल संसदेची स्थापना केली जाते. विद्यालयातील विद्यार्थ्यांना संसद म्हणजे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाचा अथवा राष्ट्राचे एक विधिमंडळ आहे . संसदेमध्ये कायदे मंजूर करणे, धोरणे ठेवणे देशातील विविध विषयांवर चर्चा करणे.
संसदेमध्ये अध्यक्ष ,प्रधानमंत्री, शिक्षण मंत्री ,क्रीडामंत्री ,पर्यावरण मंत्री स्वच्छता मंत्री. असे एकूण 14 सदस्य भाग घेतात . बाल संसद मध्ये मुलांनी मुलांसाठी आणि मुलांद्वारे चालविली एक समावेशी आणि लोक तांत्रिक संस्था आहे.
शाळेतील काही प्रश्न कसे सोडवायचे? त्यासाठी काय करावे लागेल? निर्माण झालेल्या समस्यांची मागणी कोणाकडे करायची? अशा अनेक बाबी शिकायला मिळाल्या .या कार्यक्रमाच्याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ , शाळेचे उपमुख्याध्यापक एन.आर.पाटील ,शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.अंजली गोहील, आणि ज्येष्ठ शिक्षक अरुण कुमावत , सौ.वैशाली कुमावत , कलाशिक्षक श्री.प्रमोद पाटील इत्यादी शिक्षक उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.