पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रशासकपदी निवड झाल्याबद्दल ओबीसी नेते अनिल महाजन यांचा- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्याकडून सत्कार

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रशासकपदी निवड झाल्याबद्दल ओबीसी नेते अनिल महाजन यांचा- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्याकडून सत्कार

राजकारणा पलीकडे असत मैत्रीचं नातं पक्ष कुठलाही असो. राजकारण करत असताना विचार मोठे ठेवले पाहिजे .पदाची निवड लहान असो किंवा मोठी असो याला महत्व नाही. मैत्रीमध्ये आनंद व्यक्त करण्याची व आपल्या मित्रांना प्रोत्साहन देण्याची विचारसरणी असली पाहिजे. असच एक मैत्रीचं नात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष,ओबीसी नेते अनिल महाजन यांचे आहे.

जळगाव जिल्ह्यात असलेली पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रशासकीय मंडळाची निवड झाली असता एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या शिफारशी वरून अनिल महाजन यांची महाराष्ट्र शासनाने प्रशासक म्हणून नुकतीच निवड केली. त्यानिमित्ताने आज मुंबई वांद्रे संविधान बंगला येथे अनिल महाजन यांचा सत्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी केला व शुभेच्छा पत्र दिले तसेच मिठाई खाऊ घालून भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐दिल्या.

जनते साठी लढणाऱ्या व्यक्तीचा गौरव हा होतोच