क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा तर्फे पाचोरा नगरपालिकेसमोर आमरण उपोषण

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा तर्फे पाचोरा नगरपालिकेसमोर आमरण उपोषण

गेल्या 25 ते 30 वर्षापासून पाचोरा नगरपालिकेमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय झालेला असून हा ठराव मंजूर आहे परंतु प्रत्यक्षात नियोजित जागेवर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा अजूनपर्यंत बसवलेला नाही. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी व नियोजित जागेवर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी मोर्चा चे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री सुनील आनंदराव शिंदे, श्री अशोक शंकर मोरे माजी नगरसेवक पाचोरा, श्री वासुदेव भिवसन माळी माजी नगरसेवक पाचोरा, श्री किशोर रमेश डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष समता सैनिक दल पाचोरा हे 20 जून रोजी सकाळी 10 वाजेपासून आमरण उपोषण सुरू करत आहेत तरी आंदोलनाची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनाने त्वरित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा नियोजित जागेवर बसवावा असे मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, समता सैनिक दल, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, हरिभाऊ पाटील, संस्थापक अध्यक्ष बल्लाळेश्वर फौंडेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा पाचोरा ,मराठा सेवा संघ पाचोरा, संभाजी ब्रिगेड पाचोरा, युवक काँग्रेस पाचोरा, शिवस्वराज्य युवा फाउंडेशन पाचोरा व इतर सर्व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला असून नगरपालिका प्रशासनाने वरील मागणीची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी ऍड अनिल पाटील, ऍड रणजित तडवी, मतीन रज्जाक बागवान, धनराज मेघराज पाटील यांनी केली आहे.