श्री .गो .से. हायस्कूल पाचोरा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी

श्री .गो .से. हायस्कूल पाचोरा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी

पाचोरा ( प्रतिनिधी)
तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दि.12 जानेवारी शुक्रवार रोजी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका प्रमिला ताई वाघ. यांनी या दोन्ही महान विभुतींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक एन.आर. ठाकरे. पर्यवेक्षक
आर .एल. पाटील., ए. बी अहिरे , अंजली गोहील, प्रीतम सिंग पाटील, संगीता वाघ आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते
त्यानंतर काही विद्यार्थी या दोन्ही विभूतींच्या वेशभूषा सादर करून….. आपल्या बहारदार भाषनांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचाल आर बी बोरसे यांनी केले . प्रास्ताविकेत मुख्याध्यापिका
वाघ आणि पर्यवेक्षिका अंजली गोहिल यांनी दोन्ही विभूती बद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन अंजली गोहिल यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींचे सहकार्य लाभले.