गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनीतर्फे आंतर शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन

गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनीतर्फे आंतर शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन…!!!!!

जळगाव (वार्ताहर) – श्री गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी,जळगाव,आयोजित,स्व.लक्ष्मण धुडकू पाटील,स्मृती प्रित्यर्थ १४ वर्षाआतील जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो (मुले व मुली) स्पर्धेचे आयोजन दिनांक ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने,जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत.
सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाना मोफत प्रवेश असून,सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रसुध्दा मिळणार आहे.स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २०००/- रु.रोख व चषक,द्वितीय पारितोषिक १५००/- रु.रोख व चषक तर तृतीय पारितोषिक १०००/- रु.रोख व चषक प्राप्त होणार आहे,वैयक्तिक कामगिरीत अष्टपैलू खेळ करणाऱ्या खेळाडूस ३००/- रु.रोख व चषक,उत्कृष्ट संरक्षकास २००/- रु.रोख व चषक,तर उत्कृष्ट आक्रमकास २००/- रु.रोख व चषक प्राप्त होणार आहे.
स्पर्धेची नावनोंदणीसाठी अंतिम तारीख ३० जानेवारी २०२३ असणार आहे,स्पर्धेसाठी प्रबोधिनीचे दत्ता महाजन ७०२०७५१८२३ व विशाल पाटील ९९७०३०८३२६ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन स्पर्धा प्रमुख राहुल पोळ यांनी कळवले आहे.