वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्याकडून गणपती बाप्पाला निरोप

वैशालीताई आणि नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांच्याकडून गणपती बाप्पाला निरोप


*भडगाव:* येथे गणपती बाप्पा यांनी दहा दिवस विराजमान होऊन आज आपल्यातून निरोप घेतला. पूर्ण शहर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. असा जयजयकार करीत या समारंभात सहभागी झाले. शहरातले सार्वजनिक गणेश मंडळ यांनी गणपती मूर्तीचे विसर्जन उत्साहात पार पाडले याप्रसंगी सौ. वैशालीताई आणि नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याकडून येथे श्री गणेश बाप्पाचे दर्शन करून भडगावातले सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे मनापासून हार्दिक स्वागत करण्यात आले हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला संपूर्ण नागरिकांनी गणपती बाप्पा यांना अति उत्साहात निरोप दिला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि श्रेष्ठ व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.