राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कुटुंबासाठी आणि समाजासाठी सतत आदर्शवत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते आणि गटनेते संजय ओंकार वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दिनांक १० जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा शहरातील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या मैदानावर संध्याकाळी सहा वाजता संपन्न होणार असून या समारंभासाठी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पाचोरा भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले असून समारंभाला पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

टीप- ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड ची बूस्टर डोस लस घेण्याचे देखील यावेळी व्यवस्था केलेली आहे. तरी ज्येष्ठ पात्र नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.