कर्जाणे येथील आश्रम शाळेत राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे उत्साहात उदघाटन

कर्जाणे येथील आश्रम शाळेत राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे उत्साहात उदघाटन

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन वी.प्र. देशमुख प्राथमिक आश्रमशाळा, शरच्चंद्रिका पाटील माध्यमिक आश्रम शाळा, दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील उच्च माध्यमिक आश्रम शाळा कर्जाणे येथे दि. १९ जानेवारी २०२३ ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे. या श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन आज दि.१९ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आले. याप्रसंगी शिबीराचे उदघाटक मा. श्री छगन महारू बारेला (माजी सैनिक, भारतीय सेना), कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री. गोविंदा बापू महाजन, चोपडा तालुका शेतकरी सह. सूतगिरणी चोपडाचे संचालक ॲड. श्रावण धनगर पाटील, नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष सौ. सुप्रिया कांतीलाल सनेर, श्री.सतीश बारेला, कर्जाने गावचे उपसरपंच श्री.प्रमोद भाया बारेला, जनशिक्षण संस्थेचे अधिकारी श्री मुन्नाभाऊ साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, शरदचंद्रिका पाटील माध्यमिक आश्रमशाळा, कर्जाणेचे मुख्याध्यापक श्री. दिलीप सोमा सावकारे, कर्जाने येथील वि.प्र. देशमुख प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री.रामचंद्र अमृत आखाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिबीराचे उदघाटन माजी सैनिक श्री.छगन महारू बारेला यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुहानी पावरा व गणेश कोळी या रा.से.यो. स्वयंसेवकानी स्वागतगीत सादर केले तर अंकिता बाविस्कर व गणेश कोळी या स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर केले. या श्रमसंस्कार शिबीराचे प्रास्ताविक रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी डॉ.पी.के.लभाने यांनी केले. यावेळी त्यांनी ०७ दिवसाच्या कालावधीत केल्या जाणाऱ्या कामाचा आढावा सांगितला. याप्रसंगी ॲड. श्रावण धनगर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आयुष्यातील त्याग आणि सेवेचे महत्व वर्णन केले. विद्यार्थ्यानी आपल्या कडील ज्ञान व कौशल्याचा वापर समजासाठी करावा असा संदेश दिला. यावेळी श्री. गोविंदा बापू महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, समाजसेवा, श्रमसंस्कार यातून विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधावा. यानंतर उपसरपंच श्री. प्रमोद भाया बारेला मनोगतातून श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवावा तसेच स्थानिक लोकांच्या समस्या, प्रश्न समजून घ्याव्या असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी सर्व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या ०७ दिवसात श्रमसंस्कार शिबिरात काय काय करता येईल यावर मार्गदर्शन केले तसेच महविद्यालयाने नजीकच्या काळात मिळविलेल्या यशाची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीता बी.पाटील यांनी केले व आभार श्री.बी. एच.देवरे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.एन. सौदागर, डॉ.संगीता एन. पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी आश्रम शाळा कर्जाणे येथील शिक्षक- शिक्षकेतर बंधू-भगिनी,विद्यार्थी, पालक व कर्जाणे येथील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.