रोटरी क्लब तर्फे पाचोरा येथे गर्भाशय व स्तन कर्करोग निदान शिबीर

रोटरी क्लब तर्फे पाचोरा येथे गर्भाशय व स्तन कर्करोग निदान शिबीर

पाचोरा – रोटरी क्लब ऑफ पाचोरा- भडगाव तर्फे संजीवनी हॉस्पिटल, पाचोरा यांच्या सौजन्याने पाचोरा- भडगाव येथील महिलांसाठी
भव्य गर्भाशय व स्तन कर्करोग (कैंसर) निदान विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 ते 5 दरम्यान शिबिरामध्ये 30 ते 60 वर्षे या वयोगटातील महिलांसाठी कॅन्सर अर्थात कर्करोगाची विनामूल्य तपासणी करण्यात येणार आहे.

संजीवनी हॉस्पिटल, कॉलेज चौक पाचोरा येथे आयोजित या शिबिरात
1) स्तनाची संपूर्ण तपासणी
2) गर्भाशयाच्या कॅन्सर करिता पेप्समिअर तपासणी
3) मॅमोग्राफी तपासणी (स्तन कॅन्सर)
4) दर 4 महिन्यात करावयाची स्व स्तन तपासणी प्रशिक्षण सेवा विनामूल्य देण्यात येणार आहे
शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या माता भगिनींसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. प्रथम नोंदणी करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. प्रथम वैद्यकीय तपासणी नंतरच आवश्यक असेल तर मेमोग्राफी किंवा पाप्समीयर तपासणी करण्यात येईल.

जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घेऊन कर्करोग तपासणी करून घ्यावी, असे आवाहन रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रा.डॉ.पंकज शिंदे. सचिव डॉ. मुकेश तेली, प्रोजेक्ट चेरमन डॉ. पवन पाटील यांनी केले आहे.