लोकसंघर्ष पक्षाच्या वतीने एपीएल शिधापत्रिकांच्या अनुदानासाठी गंगापूर तहसील येथे जोरदार ठीय्या आंदोलन
गंगापूर: (महेंद्र बेराड तालुका प्रतिनिधी)धान्य बंद झालेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना अनुदान मिळवून देण्यासाठी लोकसंघर्ष पक्ष गंगापूरच्या वतीने ६आक्टोबर २०२५ रोजी शासनाच लक्ष एपीएल शिधापत्रिकाधारकांच्या मागण्यांकडे वेधण्यासाठी ठीय्या आंदोलनाची करण्यात आले.
लोक संघर्ष पक्षाच्या वतीने दोन तास जोरदार घोषणाबाजी करत तहसील परिसर दणाणून सोडत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घाम फोडला.आदोलनाची तीव्रता बघत तालुका पुरवठा अधिकारी मिनल पवार यांनी लेखी पत्र देत एपीएल शिधापत्रिकाधारकांना अनुदान त्वरित वाटप केले जाईल व निवेदनाच्या अनुषंगाने उर्वरित विषयांही न्याय देऊ अंशी माहिती दिली.
तत्पूर्वी लोक संघर्ष पक्ष मराठवाडा अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित करत एपीएल शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नांची मांडणी केली.
आपल्या ठीय्या आंदोलनाला आवर्जून उपस्थित असलेले फुलशेवरा ग्रामपंचायत सदस्य कारभारी गवळी साहेब, मुनीर पटेल, हरिचंद्र रावते, ज्ञानेश्वर तोडकर, धनंजय तोडकर, जलील भाई शेख, गणेश भाऊ भुसारे, गणेश भाऊ कळसकर, ज्ञानेश्वर धनुरे आदींसह एपीएल शिधापत्रिका धारक मोठ्या संख्येन उपस्थित होते .