श्री .गो.से हायस्कूलच्या येथील विद्यार्थ्यांनी प्रणाली पाटील ला घवघवीत यश

श्री .गो.से हायस्कूलच्या येथील विद्यार्थ्यांनी प्रणाली पाटील घवघवीत यश

पाचोरा (प्रतिनिधी)
जळगाव येथे झालेल्या सतरा वर्षाखालील मुलींच्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री .गो.से हायस्कूल .ची विद्यार्थिनी प्रनाली पाटील हिने सात पैकी सहा गुण संपादन करून द्वितीय क्रमांक पटकाविला तिची नाशिक विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे .तिच्या या यशाबद्दल पी .टी .सी .संस्थेचे चेअरमन संजय वाघ व्हा.चेअरमन व्ही .टी. जोशी. स्कूल कमिटी चेअरमन खलील देशमुख. तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन .शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ . उपमुख्याध्यापक एन. आर .ठाकरे पर्यवेक्षक आर. एल. पाटील. व ए. बी. अहिरे. यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शितल.व्ही. साळुंखे . व ज्योती.एन ठाकरे . यांचे मार्गदर्शन लाभले.