आर.आर.विद्यालयाला दुहेरी मुकुट

आर.आर.विद्यालयाला दुहेरी मुकुट

 

 

 

जळगांव शहर महानगरपालिका व जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन आयोजित म.न.पा. स्तरीय आंतरशालेय खो खो स्पर्धेला दि.4 ऑक्टोबर2025 व 5 ऑक्टोबर20525 रोजी झालेल्या .14 वर्ष आतील मुलींचे 22 व मुलांचे 19 संघ सहभागी झाले होते. ह्या स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे मैदानावर पार पडल्या. श्री दीनानाथ भामरे क्रीडा अधिकारी मनपा ,श्री मीनल थोरात राज्य क्रीडा मार्गदर्शक, श्री जयांशू पोळ सहसचिव महाराष्ट्र खो खो असोसिएशन, श्री राहुल पोळ सचिव जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन , सौ.विद्या कलंत्री मॅडम खजिनदार जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली पंच म्हणून दत्तात्रय महाजन विशाल पाटील, दिलीप चौधरी, प्रेमचंद चौधरी,देविदास महाजन, निखिल पाटील, हर्षल बेडिस्कर,स्वप्नील कोळी ,गोपाळ पवार, निरंजन ढाके, रोहित सपकाळे, छगन मुखडे, अंजली सावंत, प्रतिक्षा सपकाळ यांनी काम पाहिले व स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जळगांव जिल्हा खो खो असोसिएशनचे व श्री. गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी च्या खेळाडूंनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे.

 

➡️ *14 मुली*

 

🥇 *प्रथम – आर.आर.विद्यालय जळगांव*

🥈 *द्वितीय – अनुभुती इंग्लिश स्कुल, जळगांव*

🥉 *तृतीय – श्री राम माध्यमिक विद्यालय, जळगांव*

 

➡️ *14 मुले*

🥇 *प्रथम – आर.आर.विद्यालय, जळगांव*

🥈 *द्वितीय – विवेकानंद इंग्लिश मेडिअम स्कुल, जळगांव*

🥉 *तृतीय – अनुभूती इंग्लिश स्कुल , जळगांव*