गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले १९२ वी जयंती उत्साहात साजरी

_गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले १९२ वी जयंती उत्साहात साजरी…!!!!!_

कोळगाव ता.भडगाव(वार्ताहर)-कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथे स्रियांसाठी शिक्षणाची कैवाडं उघडून ज्ञानाच्या गंगोत्री निर्मिती करणाऱ्या थोर समाजसुधारक,स्री क्रांतिकारक स्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या “सावित्रीबाई फुले” यांची १९२ वी जयंती उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्रा.माया मराठे उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमेस श्रीफळ,पुष्पहार अर्पण तसेच पुजन करुन करण्यात आली यावेळी प्रा.माया मराठे,प्रा.सोनाली सोनवणे,प्रा.प्रविणा पाटील,प्रा.प्रतिभा केदार,प्रा.मनिषा बोरसे आदि उपस्थित होत्या.
कार्यक्रमात कु.ज्योत्स्ना लोहार,कु.प्रिती शिंपी,कु.मनिषा माळी,कु.प्रगती पाटील,कु.चेतना पाटील,कु.प्रणिता पाटील,कु.गायत्री पाटील,कु.प्रियंका पाटील आदिंनी सावित्रीबाईंच्या अद्वितीय कार्याचा गौरव आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले यांनी समाजातील स्री शिक्षणासाठी तसेच अज्ञान व अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण अध्यक्षीय भाषणात प्रा.किशोर चौधरी यांनी व्यक्त केली.
प्रा.आर.ए.पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे प्रास्तविक कु.प्रणाली शिंपी तर सुत्रसंचलन कु.चेतना पाटील हिने केले तर आभार कु.प्रियंका पाटील हिने मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनिल पाटील तसेच पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी परिश्रम घेतले.