गो.पू. पाटील विद्यालय कोळगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

गो.पू. पाटील विद्यालय कोळगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

दिनांक ८/३/२०२४ जागतीक महिला दिनानिमित्त गो.पू.पाटील विद्यालयात सर्व महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सर्व महिला कर्मचाऱ्यांना मा. मुख्याध्यापक श्री सुनील पाटील यांच्या शुभहस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस.ए. वाघ सर यांनी केले. आभार श्री एस. एन. पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.