पाचोऱ्यात महावितरण अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या जाळ्यात
तक्रारदार- पुरुष, 32वर्ष.आरोपी-मनोज जगन्नाथ मोरे , वय -38, पद- सहा. अभियंता,म. रा. वि. वि. पाचोरा 2उपविभाग खाते – महावितरण रा.अभियंता नगर,संभाजी चौकाच्या जवळ, पाचोरा, जि. जळगाव. ( वर्ग-२ )
लाचेची मागणी-
दिनांक 11.08.2025 व दिनांक 12.08.2025 रोजी.
चालू 3 कामांचे 9000 व मागील 28 कामांचे 70,000/- अशी एकूण मागणी 79,000/- रुपये
लाच स्वीकारली
दिनांक 12.08.2025 रोजी 29000/- रु.
▶️ *लाचेचे कारण* –
तक्रारदार यांचा सोलर फिटिंग चा व्यवसाय आहे. त्यांनी एकूण 3 प्रकरणे तयार करून online द्वारे सबमिट केले होते. सदर तीन ही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी ३००० प्रमाणे एकूण ९००० व यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिली आहे त्याची लाच मागत असल्याने तक्रारदार यांनी दिनांक ११/०८/२०२५ रोजी लाप्रवी जळगाव येथे तक्रार दिली होती. पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तीन प्रकरणांचे रेग्युलर प्रमाणे ९००० ची मागणी केली तसेच यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे त्याचे तुम्ही वन टाइम पेमेंट करत आहात म्हणून २५०० प्रमाणे ७०००० रुपये होतात त्यापैकी तुम्ही ३०००० दिले आहेत उर्वरित ४०००० पैकी पहिल्या हप्त्याचे आज २०००० व चालूच्या ३ प्रकरणांचे ९००० अशी एकूण २९००० ची मागणी करून २९००० रुपये स्वकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज रोजी आलोसे यांच्या कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले असता आलोसे यांनी स्वत: लाचेची रक्कम स्वीकारली आहे म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुध्द भ्र.प्रति.अधि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी* –
*योगेश ठाकूर,*
पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग.जळगाव
मो. न. 9702433133
सापळा व तपासी अधिकारी
*स्मिता नवघरे*,
पोलीस निरीक्षक,ला. प्र. वि. जळगाव
सापळा पथक-
पो.कॉ.राकेश दुसाने,अमोल सूर्यवंशी,प्रणेश ठाकूर,चालक सुरेश पाटील,सर्व नेमणूक ला.प्र.वि. जळगाव युनिट.
मार्गदर्शक
मा. श्री भारत तांगडे
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मो.न. 8888832146.
मा. श्री. माधव रेड्डी
अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी .नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मो .नं .9404333049
————————–
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जळगाव येथे संपर्क करावा.