नागपूर येथे पोलीस पाटीलांचा मोर्चा रवाना पाचोरा कॉंग्रेसचा मोर्चा ला पाठींबा

नागपूर येथे पोलीस पाटीलांचा मोर्चा रवाना पाचोरा कॉंग्रेसचा मोर्चा ला पाठींबा

पाचोरा (प्रतिनिधी) – नागपूर येथील विधानसभेवर पोलीस पाटीलांचा लाखोंच्या संख्येने होत असलेल्या मोर्चा साठी पाचोर्यातुन पोलीस पाटील बांधव रवाना झाले कॉंग्रेस ने पाठींबा दिला आहे

 

महाराष्ट्रातील पोलीस पाटील बांधव आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दि २१ रोजी नागपूरात धडकत असुन लाखोंच्या संख्येने पोलीस पाटील बांधव सामिल होत आहे. यात पाचोरा रेल्वे स्थानकावरुन तालुक्यातील पोलीस पाटील बांधव मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. या मोर्चाला पाठींबा देत कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी पोलीस पाटील बांधवांना रवाना करण्यासाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी म्हणाले की विधानसभेत आमदारांच्या मानधन पासून सेवानिवृत्ती पेन्शन, चालक, स्विय्य सहाय्यक अशांचे मानधन एकमताने मंजूर करण्यात येते मग पोलीस पाटील यांचे मानधन महागाई च्या दुनियेत तुटपुंज्या स्वरूपाची का? सन १९६७ च्या कालबाह्य कायद्यात तात्काळ बदल होणे क्रमप्राप्त आहे याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी करत पोलीस पाटील यांच्या मोर्चा ला पाठींबा दिला आहे .यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा संघटक विनोद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम तेली, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, नितीन जमदाडे, एकनाथ कोळी, सह जवळपास ५० हुन अधिक पोलीस पाटील रवाना झाले आहे.