चोपडा महाविद्यालयात ‘शरभंग’ नियतकालिक प्रकाशन व ‘गुणवंतांचा सत्कार सोहळा’ उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘शरभंग’ नियतकालिक प्रकाशन व ‘गुणवंतांचा सत्कार सोहळा’ उत्साहात संपन्न

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात ‘शरभंग’ या वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन तसेच विद्यापीठ गुणवत्ता यादीत यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘सत्कार समारंभाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.मा.आ.डॉ. सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती.आशाताई विजय पाटील ह्या उपस्थित होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील तसेच कार्यक्रमाचे उदघाटक व चोपडा येथील नृसिंह हॉस्पिटलचे संचालक डॉ.दीपक ओंकार पाटील त्याचप्रमाणे प्रताप विद्यामंदिर चोपडा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.आर.डी. शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे, प्रा.डॉ. अरुण मोरे, प्रा.अतुल इंगळे, रजिस्ट्रार श्री.डी.एम. पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी महाविद्यालयाच्या विकासाचा लेखाजोखा मांडताना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांच्या यशामध्ये संस्था, महाविद्यालय आणि मार्गदर्शक शिक्षकांचे परिश्रम यांचाही वाटा असतो. पूरक सुविधा, अचूक मार्गदर्शन व परिश्रम हे विद्यार्थ्यांच्या यशामागचे गमक असते. वार्षिक नियतकालिक हा महाविद्यालयाचा आरसा असतो.विद्यार्थ्यांच्या मनातील विचार, भावना, कल्पना यांना मांडण्यासाठी मुक्त व्यासपीठ नियतकालिकाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. यातूनच विचारवंत विद्यार्थी घडत असतात.
यावेळी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना नृसिंह हॉस्पिटलचे संचालक डॉ.दीपक ओंकार पाटील म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्ये आत्मसात करायला हवे कारण उत्तम संवाद साधून माणसं जोडता येतात. विद्यार्थ्यांनी लेखन करतांना विचारपूर्वक व अचूक मांडणी करायला हवी.
याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या मार्फत एप्रिल/मे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या विद्यापीठ परीक्षेच्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले. या गुणवत्ता यादीत महाविद्यालयातील बीएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थीनी साळी लतिका राजेंद्र हिने विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान मिळवला. बीएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील सोनवणे कोमल लक्ष्मण या विद्यार्थिनीने विद्यापीठ गुणवत्ता यादी द्वितीय क्रमांक पटकावला तर दानेश अली सादिक अली या विद्यार्थ्याने विद्यापीठ गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक मिळविला आहे. एम.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स वर्गातील पाटील आकाश जितेंद्र या विद्यार्थ्याने विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तसेच वाघ कल्पेश प्रल्हाद या विद्यार्थ्याने विद्यापीठ गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त करण्याचा मान मिळवला आहे. टी.वाय.बीकॉम. वर्गातील पाटील चेतना छोटू या विद्यार्थिनीने विद्यापीठ गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकावला. एम.कॉम या वर्गातील पाटील अंकिता संजय या विद्यार्थिनीने विद्यापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर गुजराथी साक्षी नितीन या विद्यार्थिनीने विद्यापीठ गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त केला. टी.वाय.बी.ए. हिंदी या विषयातील सपकाळे विशाल गोपीचंद या विद्यार्थ्याने विद्यापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. एम.ए. मराठी वर्गातील पाटील हेमंत राजेंद्र या विद्यार्थ्याने विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला. एम.ए.अर्थशास्त्र विषयाचा विद्यार्थी मगरे आकाश कैलास याने विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस.ए.वाघ यांनी केले.
याप्रसंगी श्री.आर.डी. शिंदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाविद्यालयाचे शरभंग हे नियतकालिक महाविद्यालयाचे प्रतिबिंब असून त्यात विद्यार्थी महाविद्यालयीन विकासाचा, कलागुणांचा व विचारांचा संयुक्त मेळ घातलेला दिसून येतो. हे नियतकालिक विद्यार्थ्यांच्या विचारांना विकसित करणारे महत्त्वपूर्ण साधन आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.बी.पाटील यांनी केले तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुणगौरव समिती प्रमुख तसेच सदस्य त्याचप्रमाणे शरभंग नियतकालिक संपादक मंडळ समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनी उपस्थित होते.