आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल व डिझेलमध्ये दररोज दरवाढ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन पाचोरा शहरात केंद्र सरकारचा निषेध.
पाचोरा-विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जनतेच्या ज्वलंत मागण्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचे विरोधात प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये सध्या सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक यांना जीवन जगावे लागत आहे.यावेळी माजी आमदार दिलिप वाघ यांनी सांगितले की डिझेल, पेट्रोल व स्वयंपाकाचा गॅस अश्या विविध पेट्रोलजन्य इंधनाचे व खाद्य तेलाचे भाव सातत्याने गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रासदायक भार सहन करावा लागत आहे. खरीप पिकांच्या पेरणीच्या सध्याच्या काळात शेतकऱ्यांना बी – बियाणे, खते, कीटकनाशक खूपच महागड्या दरात खरेदी करावे लागत आहेत. तसेच खरेदीदार शेतकऱ्यांना नोंदणी, आधार कार्ड वगैरे पुराव्यांच्या नको त्या जाचक अटी लागू केल्या आहेत. एक प्रकारे सर्व प्रामाणिक शेतकऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहण्याचा हा कार्यक्रम राबवला जात आहे. तरी शेतकऱ्यांशी सुरू असलेली ही त्रासदायक वर्तणूक बंद करावी व गरजेनुसार बी – बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करावा. आणि या सर्व वस्तूंचे भाव कमी करण्यात यावे. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीला अतिशय विकृत स्वरूप देऊन जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करून “ओबीसी विरुद्ध मराठा” असा नवा वाद निर्माण करण्याचे उद्योग केंद्र सरकारच्या यंत्रणेने सुरू केले आहेत. त्या निरर्थक पण समाजात आणि जाती – जातीत संघर्ष निर्माण करणाऱ्या उपद्व्यापाना पायबंद घालण्यात यावा आणि सकल मराठा समाजाच्या मागण्या कोणत्याही अन्य समाजघटकांना धक्का न लागू देता मान्य करणाऱ्या भूमिकेला केंद्राने पाठिंबा द्यावा.
कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा केंद्र सरकारच्या बेजबाबदार आणि आडमुठ्या धोरणामुळे निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य जनतेला लसीकरणासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोविडसारख्या जीवन-मरणाशी संबंधित कठीण महामारीचे निर्मूलनाच्या नियोजनात भाजपा विरोधी राज्यांशी दुजाभाव केला जात आहे. तो त्वरित थांबवावा आणि कोविड प्रतिबंधक लस सर्वत्र तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी असे मत यावेळी माजी आमदार वाघ यांनी मांडले यावेळी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,गटनेते नगरपालिका संजय वाघ,
नितीन तावडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख,खालील देशमुख, जिल्हा प्रवक्ता , तालुका अध्यक्ष विकास पाटील,तालुका अध्यक्ष भडगाव
संतोष जाधव, शहराध्यक्ष अजहर खान, शाम भोसले, शहराध्यक्ष भडगाव हर्षल पाटील, कार्याध्यक्ष भडगाव विजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष
युवक शहराध्यक्ष, सुदर्शन सोनवणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शालिग्राम मालकर सतीश नारायण चौधरी, सदस्य एडवोकेट अविनाश सुतार, लीगल सेल अध्यक्ष स्वप्निल अमृत पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस भडगाव स्वदेश पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस भडगाव
ललित राजेंद्र वाघ, पंचायत समिती सदस्य विनोद भिकन तावरे, सरपंच नांद्रा
प्रकाश एकनाथ पाटील, वाडी
सुदाम वसंत वाघ, खडकदेवळा
डॉ. अमृत विनायक पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष
बशीर बागवान, नगरसेवक
अशोक शंकर मोरे, नगरसेवक
रामधन बद्रीनाथ परदेशी
उमेश संजय एरंडे, युवक जिल्हा संघटक
अभिजित सिद्धार्थ पवार, युवक तालुकाध्यक्ष
सचिन संजय शिंदे, जिल्हा सचिव
पंकज गढरी, जिल्हा उपाध्यक्ष
गौरव पाटील, जिल्हा सरचिटणीस
ज्योती संजय वाघ, महिला पदाधिकारी
अभिलाशा रोकडे, युवती तालुका अध्यक्ष पाचोरा
स्नेहा नाना गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य
दक्षता विठ्ठल पाटील, तालुका अध्यक्ष युवती भडगाव
योजना दत्तात्रय पाटील, नगरसेविका भडगाव
रेखा सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष महिला भडगाव
हर्षा विठ्ठल पाटील, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते