समस्यांची फाईल बंद करतो साहेब पण देवळाली – भुसावळ एक्स्प्रेस पूर्ववत कराच – रेल्वे सल्लागार दिलीप पाटील यांनी मंडळ अधिकाऱ्यांना केल्या सूचना

समस्यांची फाईल बंद करतो साहेब पण देवळाली – भुसावळ एक्स्प्रेस पूर्ववत कराच – रेल्वे सल्लागार दिलीप पाटील यांनी मंडळ अधिकाऱ्यांना केल्या सूचना

मंडल रेल उपयोगकर्ता सलाहकार समितीची १६९ वी बैठक आज दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी भुसावळ रेल मंडळ येथे मंडल रेल प्रबंधक एस. एस. केडिया यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली,
यात समितीच्या १२ सदस्यांनी आपापल्या स्टेशन वरील समस्या भुसावळ मंडळ अधिर्यांसमोर मांडल्या,
यात पाचोरा स्टेशन वरील विविध समस्या जशा की संपूर्ण रेल्वे जंक्शन स्टेशन CCTV कॅमेरा कक्षेत यावे, स्वयंचलित जिना, डिजीटल कोच पोजिशन, Wifi सुविधा, दादरा स्टील रेलिंग, वाटर स्टँड बेसिन समस्या, प्लॅटफॉर्मवर दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प व्यवस्था, PA Announcement सिस्टम कार्यरत समस्या, स्टेशन पार्किंग समस्या या लक्षात आणून देत तात्काळ सर्वच समस्यांचे निराकरण करून मिळावेत अशी विनंती करीत सर्वात महत्वपूर्ण व चाकरमान्यांसह, व्यापारी विध्यार्थी व ग्रामीण जनतेसाठी महत्व असलेली ११११३ देवळाली भुसावळ पॅसेंजर/एक्स्प्रेसला आपल्या पुर्व वेळेवर म्हणजेच देवळाली येथून ४:४० Am ला सुरू करत देवळाली भुसावळ मधील प्रवाशांना दिलासा देण्याच्या सूचना केल्यात तर पाचोरा जंक्शनवरील या सर्व समस्यांची फाईल बंद करतो पण आमची सर्वसामान्य जनतेची जिवनवाहिनी ही ट्रेन पूर्ववत कराच अशा विनविण्या पाटील यांनी केल्या असून आपल्या पाचोरा जंक्शनवरील समस्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे लेखी व तोंडी स्वरूपाचे आश्वासन भुसावळ मंडळ अधिकाऱ्यांकडून दिलिप पाटील यांना देण्यात आले,
या बैठकीत समिती सदस्यांसह भुसावळ मंडळ अधिकारी एस.एस.केडीया, सुनील कुमार सुमन, कौशेलेंद्र कुमार, डॉ. शिवराज मानसपुरे, नवीन पाटील, डॉक्टर संजीव. एन.के, डॉक्टर आर. एन. मीना, सी.वी. कदम, एम.पी.खोब्रागडे, जे पालटा सिंह, निखिल सिंह, हिमांशू रामदेव, अरशद आलम खान, तरुण दंतोतिया, एस. एच.राव, यांसह सर्वच अधिकारी उपस्थित होते,