नांद्रा क्रिएटिव्ह स्कूलला संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त गिरवले विद्यार्थ्यांनी स्वच्छताचे धडे

नांद्रा क्रिएटिव्ह स्कूलला संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त गिरवले विद्यार्थ्यांनी स्वच्छताचे धडे

नांद्रा ता. पाचोरा (वार्ताहर )- येथील क्रिएटिव्ह स्कूल ला संत शिरोमणी स्वच्छता दूत संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांनी सकाळीच स्वयंस्पर्तीने स्कूल ला येऊन झाडू खराट्यांनी संपूर्ण परिसर,वर्ग स्वच्छ करून परिसरातील झाडांना पाणी दिले व सोबत गाडगेबाबांची “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला “”भजन म्हणून त्यानंतर गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन माल्या र्पण करून मनोगते व्यक्त केली,यामुळे विद्यार्थ्यांनी त्यानिमित्त स्वतः स्वच्छतेचे धडे गिरवल्याचे दिसून आले.”संत शिरोमणी खरा कर्मयोगी जगी थोर झाले गाडगेबाबा” अशा या अवलिया महापुरुष डेबूजी झिंगोजी जानोरकर म्हणजेच संत गाडगे महाराज यांची 20डिसेंबर रोजी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रा. यशवंत पवार, नम्रता पाटील,अरुंधती राजेंद्र, वैशाली पाटील, श्वेता बोरसे, पूजा काळे, पुनम सोनवणे, अनुराधा पाटील, सोनल ,पूजा धोबी यांनी परिश्रम घेतले