पाचोरा येथील दत्त जयंती निमित्त दत्ताच्या पालखीचे भव्य मिरवणूक उत्साहात

पाचोरा येथील दत्त जयंती निमित्त दत्ताच्या पालखीचे भव्य मिरवणूक उत्साहात

पाचोरा येथील वाणी गल्ली विठ्ठल मंदिर रोड येथील दत्त जयंती निमित्त दत्ताच्या मंदिरात आरती तसेच प्रसादाचा कार्यक्रम करीत सायंकाळी दत्ताच्या पालखीचे नियोजन करून भव्य अशी मिरवणूक जामनेर रोड गांधी चौक रथ गल्ली आठवडे बाजार रंगार गल्ली विठ्ठल मंदिर रोड अशी काढून मिरवणुकीत प्रचंड उत्साह व आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी टाळ मृदुंग च्या गजरात दत्त महाराजांच्या जय घोषणेने परिसर दणदणला यावेळी श्री दत्तांच्या पालखीचे ठिकठिकाणी नागरिकांनी व महिलांनी पूजन करून श्री दत्ताचे दर्शन घेतले तसेच या परिसरातील सर्व नागरिक सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित व्यापारी समाज बांधव तसेच महिला वर्ग व बालगोपाळ मंडळ उपस्थित होते श्री दत्ताच्या मंदिरात आरती करून व प्रसाद देऊन समारोप करण्यात आला यावेळी श्री दत्ताच्या आरती चे पूजन श्री अण्णा भडजी यांनी केले तसेच या श्री दत्त मंदिराचे ट्रस्ट मंडळ यांनी नियोजन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली श्री दत्तात्रय पांडुरंग सिनकर श्री रत्नाकर चंद्रकांत सिनकर श्री भरत जनार्दन सिनकर श्री प्रकाश पुंडलिक सिनकर श्री मधुकर रामचंद्र सिनकर श्री रमेश पांडुरंग सिनकर श्री गणेश सुभाष सिनकर श्री अजय भालचंद्र सिनकर श्री अभिजीत वसंत सिनकर श्री विशाल मधुकर सिनकर, श्री स्वप्निल मधुकर शिनकर श्री मयूर भरत सिनकर श्री सागर वसंत सिनकर तसेच सिनकर परिवारातील सर्व सदस्य व महिला उपस्थित होत्या