पाचोऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवसचे औचित्य साधत स्वच्छता मोहीम
पाचोऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस औचित्य साधत स्वच्छता मोहीम भाजपा शहर तर्फे न. पा . पाचोरा स्वच्छता कर्मचारी यांचे सहकार्य घेत सकाळी 8 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराजांचे स्मारकभोवती स्वछता अभियान सुरुवात करून हुतात्मा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छते नंतर अग्निशमन दलाचे सहकार्याने सदरच्या थोर महापुरुषांच्या स्मारक स्वच्छ पाण्याने धुऊन नंतर माल्यार्पण करण्यात आले. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपा शहर मंडल अध्यक्ष दीपकभाऊ माने अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रहीम बागवान , उपाध्यक्ष सरलाताई पाटील युवा मोर्चा अध्यक्ष योगेश ठाकूर, सरचिटणीस जगदीश पाटील, वीरेंद्र चौधरी, महिला आघाडी अध्यक्षा ज्योतीताई भामरे, मांडोळे मॅडम, चिटणीस उमेश माळी, चिटणीस संदीप पवार चिटणीस प्रदीप पाटील शहर सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष प्रदीप चौधरी विजय चौधरी राहुल महाजन सह सर्व शहर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. त्यानंतर भडगाव रोडवरील धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकभोवती सुद्धा स्वच्छता अभियान राबवून मोहिमेची सांगता करण्यात आली.
























