प्रहार संघटनेच्या जिल्हध्यक्षपदी सचिन माडोळे यांची निवड

प्रहार संघटनेच्या जिल्हध्यक्षपदी सचिन माडोळे यांची निवड

प्रतीनिधी-
जी व्यक्ती आपल्या अभिनयातून अनेक विविध अंगी रुपे सादर करते…आणि त्यातील भावना त्यांच्या अभिनयातून आपल्यापर्यन्त पोहोचवण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तिस कलाकार म्हणतात…
एखादा चांगले-वाईट अभिनय करुन वेगवेगळ्या पात्रात भूमिका बजावत असणाऱ्यास आपण कलाकार म्हणतो…
ज्या व्यक्तीच्या अंगी विभिन्न कला असणाऱ्यास कलाकार संबोधले जाते… नाटकाच्या रंगमंचावर तो अनेक जिवन जगत असतांना अनेक पात्र रंगवत आसतो आणि प्रेक्षकांच्या एका टाळीसाठी भुकेला असतो.माणसाचं आयुष्य दाखवता दाखवता त्याचच आयुष्य हरवुन गेलेलं आसतं. खर्या जिवनाच्या रंगमंचावर मात्र तो सतत संकटाच्या वाटेवर चालतांना दिसतो.अनेक समस्यांना तोंड देत देत तो जगाला हसवत असतो आणि त्यांच दुखं विसरायला लावत असतो.परंतु याच कलाकारांच्या दु:खाला दुर करण्यासाठी अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना अनेक वर्षापासून या कलावंताच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या माध्यमातून कलाकारांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवून त्याची मदत करुन कलेचा वारसा जिवंत रहावा या साठी कार्य केले जाते. बच्चु भाऊ कडु आज उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. एक दबंग आमदार आणि वेळी आक्रमक नेते, जनसामान्याचा अपना भिडु बच्चु कडु अशी ज्यांची ख्याती . याच बच्चु भाऊंची हि अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना सध्या अखंड महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातील कलाकारांना उभी करुन त्यांच्या साठी लढत आहे. याच अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेची संपूर्ण महाराष्ट्राची कार्यकारणी काल जाहीर झाली. आणि आपल्या जळगाव अखिल भारतीय चित्रपट संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष पदी सचिन मांडोळे यांची निवड करन्यात आली आहे. सचिनला सामाजिक कार्यात आवड आहे आपल्या अभिनयातून सचिनने छाप सोडली असुन कलर्स मराठी वरिल मालिकेत देखील सहभाग आहे. अनेक चित्रपटात मालिकेत सचिन यांना आवड असुन अभिनय क्षेत्रात त्यांचा सहभाग असतो. चाळीसगाव तालुक्यातिल खडकी येथील रहीवासी असुन या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहे.