राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत एस एस एम एम महाविद्यालयाच्या विध्यार्थीनीचे वर्चस्व

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत एस एस एम एम महाविद्यालयाच्या विध्यार्थीनीचे वर्चस्व

जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटने तर्फे महाराष्ट्रात व राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी पाचोरा *एम एम कॉलेज 12वी कला शाखेतील विद्यार्थिनी* तसेच जैन स्पोर्टस अकडमी ची खेळाडू भाग्यश्री प्रवीण पाटील हीने गुरगाव येथे ९ ते १३ मार्च पर्यंत झालेल्या २० वर्षातील जूनियर ३५ वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत साडेसात गुणांसह द्वितीय क्रमांक पटकाविला व ७२ हजार रुपयाचे रोख पारितोषिक सह भारत सरकार तर्फे सहा फॉरेन टूर व पाच ग्रॅंडमास्टर चे कॅम्प साठी तिची भारत सरकार तर्फे निवड झाल्याबद्दल पिटीसी चेअरमन नानासो संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वासुदेव वले, तसेच बुद्धिबळ खेळाचे महाराष्ट्राचे पंच एन आर ठाकरे सर , संजय सूर्यवंशी सर व महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक तसेच पाचोरा तालुका क्रिडा समन्वयक प्राध्यापक गिरीष पाटील उपस्थित होते