गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महाविद्यालयास तालुकास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत सांघिक विजेतेपद

गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महाविद्यालयास तालुकास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत सांघिक विजेतेपद….!!!!!!

भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील खेळाडूंनी जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजित तालुकास्तरीय १९ वर्षाआतील शालेय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात विजयी/उपविजयी होत महाविद्यालयास सांघिक विजेतेपद प्राप्त करुन दिले असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे….!!!!

*१९ वर्षाआतील (मुले)*

गोपाल गावंडे (४×१०० मी. रिले प्रथम,१०० मी.द्वितीय)
निकेश कोळी (४×१०० मी.रिले प्रथम,२०० मी.द्वितीय)
गौरव भदाणे(४×१०० मी.रिले प्रथम,४×४०० मी.रिले प्रथम,४०० मी.प्रथम)
मोहन पाटील (४×४०० मी.रिले प्रथम,४०० मी.तृतीय,क्रॉसकंट्री चतुर्थ)
निखिल देसले (४×१०० मी.रिले प्रथम,४×४०० मी.रिले प्रथम,८०० मी.प्रथम,लांबउडी प्रथम,उंचउडी द्वितीय)
गौतम मोरे (४×४०० मी.रिले प्रथम,१५०० मी.प्रथम,क्रॉसकंट्री प्रथम,३००० मी.तृतीय)
चंद्रकांत सोनवणे (११० मी.व ४०० मी.हर्डल्स प्रथम)
हर्षल पाटील (उंचउडी प्रथम,हातोडाफेक द्वितीय)
नितीन महाजन (५ कि.मी.चालणे प्रथम व थाळीफेक प्रथम)
कैलास पाटील (थाळीफेक द्वितीय)
ऋषिकेश पाटील (हातोडाफेक प्रथम)
प्रणव गोसावी (४×१०० मी.रिले प्रथम)
योगेश निकम (४×४०० मी.रिले प्रथम)
मिलींद पाटील (क्रॉसकंट्री द्वितीय)
प्रमोद पाटील (क्रॉसकंट्री तृतीय)

*१९ वर्षाआतील (मुली)*

वर्षा पाटील (१०० मी.प्रथम,१५०० मी.प्रथम,गोळाफेक प्रथम,क्रॉसकंट्री द्वितीय,४×१०० मी.रिले द्वितीय)
ऐश्वर्या पाटील (३००० मी.प्रथम,उंचउडी प्रथम,क्रॉसकंट्री प्रथम,४×१०० मी.रिले द्वितीय)
भाग्यश्री पाटील (१५०० मी.द्वितीय,२०० मी.तृतीय,क्रॉसकंट्री तृतीय)
सुप्रिया पाटील (५ कि.मी.चालणे प्रथम,४×४०० प्रथम,८०० मी.द्वितीय,४×१०० मी.रिले द्वितीय)
भाग्यश्री पवार (४×४०० मी.रिले प्रथम,५ कि.मी.चालणे द्वितीय,४०० मी.तृतीय)
हर्षदा पाटील (४×४०० मी.रिले प्रथम,४०० मी.द्वितीय)
पायल पाटील (८०० मी.प्रथम,४×४०० मी.रिले प्रथम,३००० मी.द्वितीय,४×१०० मी.रिले द्वितीय)
गायत्री सोनवणे (११० मी. व ४०० मी. हर्डल्स प्रथम,लांबउडी प्रथम)
प्रियंका सोनवणे (११० मी. व ४०० मी.हर्डल्स द्वितीय)
विशाखा महाजन (४×४०० मी.रिले प्रथम,उंचउडी द्वितीय,४×१०० मी.रिले द्वितीय)
चेतना चौधरी (तिहेरी उडी व भालाफेक प्रथम)
पुजा साळुंखे (गोळाफेक व थाळीफेक द्वितीय,क्रॉसकंट्री पंचम)
सविता महाजन (थाळीफेक प्रथम)
नम्रता हिरे (क्रॉसकंट्री षष्टम)

स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयातील खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील,प्रभारी प्राचार्य संदीप बाविस्कर तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.