कृषी कन्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी कन्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी महाविद्यालय धुळे येथील कृषी कन्यांकडून ग्रामीण कृषी जागरूकता व कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना गाव, पीक पाहणी सह शिवाराच्या माहितीचे आदान प्रदान चालू आहे.

गेल्या 3 आठवड्यापासून या कृषी कन्या पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव जि. जळगाव येथे राहत आहेत.

विद्यार्थीनींनी शेतकऱ्यांना विविध कृषी ॲप्ससबद्दल माहिती सांगितली. तसेच विविध कृषी योजना, नवीन तंत्रज्ञान, पीक कीड नियंत्रण व रोग व्यवस्थापन त्याचबरोबर तणनियंत्रण यावर मार्गदर्शन केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय धुळे येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कृषि कन्या – अभिलाषा जाधव, संपदा गागरे, प्राजक्ता गजरे, वैष्णवी डमरे, स्नेहल घोगरे, अदिती जाधव, क्रांती चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामस्थांनी शंकांचे निरसन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.