नोकरी मागणारे न होता, नोकरी देणारे व्हा! – मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी

नोकरी मागणारे न होता, नोकरी देणारे व्हा! – मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी

पाचोरा (प्रतिनिधीदि). 11 – आज रोजी एस.एस. एम. एम. महाविद्यालय पाचोरा येथे वाणिज्य विभागामार्फत वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक म्हणून संस्थेचे व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी हे होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. शिरीष पाटील उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून मा. डॉ. आर. डी. वाघ हे होते. उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. टी. सूर्यवंशी उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. आर. डी. वाघ यांनी उद्योजक या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योजक कसे निर्माण होतील? या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांनी उद्योजकतेचे महत्त्व तसेच नवीन शैक्षणिक धोरण बाबत मार्गदर्शन केले. तसे विद्यार्थ्यांना तुम्ही नोकरी मागणारे न होता, नोकरी देणारे व्हा! असे मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाणिज्य विभागप्रमुख प्रा. वाय. बी. पुरी यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. एस. बी. तडवी यांनी केले. आभार प्रा. सरोज अग्रवाल यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. के. एस. इंगळे, प्रा. महेंद्र मिस्तरी, प्रा. आर. बी. वळवी, प्रा. स्वप्नील भोसले, डॉ. माणिक पाटील, प्रा. डॉ. वैष्णवी महाजन मॅडम, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.