पाचोरा येथील माहेश्वरी महिला मंडळ धार्मिक कामासाठी अग्रेसर असून श्री शिव पुराण महा कथेसाठी सुरक्षा कवच बनवून सेवेकडे साठी स्तुत्य उपक्रम करणार

पाचोरा येथील माहेश्वरी महिला मंडळ धार्मिक कामासाठी अग्रेसर असून श्री शिव पुराण महा कथेसाठी सुरक्षा कवच बनवून सेवेकडे साठी स्तुत्य उपक्रम करणार

पाचोरा प्रतिनिधी पाचोरा- येथील माहेश्वरी महिला मंडळ प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहून महिला वर्ग आनंद व्यक्त करून सहभागी होत असतात दरवर्षी माहेश्वरी महिला मंडळ तर्फे त्यांच्या संतांची पालखी काढून भव्य मिरवणूक काढतात त्यावेळी ते मंदिरामध्ये रांगोळीची सजावट विविध धार्मिक कार्यक्रम साठी लागणारे साहित्य आणून पूजा करीत असतात माहेश्वरी महिला मंडळ या पाचोरा शहरातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमांमध्ये नवरात्र मध्ये देवी माता चे जनजागरण करून पूजा पाठ करून विधी करीत असतात विविध धर्माच्या मिरवणुकांमध्ये सामील होऊन हजर असतात पाचोरा येथे श्री शिव महापुराण कथा आयोजित केलेले असल्या ठिकाणी माहेश्वरी महिला मंडळातर्फे सुरक्षेसाठी सुरक्षा कवच स्वतः महिला तयार करत असून त्यांनी धार्मिक कामासाठी आपला हातभार लावत असून त्यांनी समाजातील सर्वच महिलांना श्री महापुराण कथा ऐकण्यासाठी यावे यासाठी सुद्धा बैठक घेऊन सर्वांना सूचना व मार्गदर्शन केले यावेळी माहेश्वरी महिला मंडळाचे अध्यक्ष सौ मंगला बाहेती उपाध्यक्ष सौ सुरेखा बंग कोषाध्यक्ष वंदना काबरा सल्लागार लीला तोतला लीला राखी शोभा कपडे सुनिता लाहोटी पाचोरा शहर अध्यक्ष सौ प्रिया लाहोटी सचिव सौ अंजली न्याती उपाध्यक्ष जया राठी सहसचिव सौ उषा बाहेती या सर्व कार्यकारणी सदस्य व समाजातील महिला उपस्थित होत्या