पाचोरा प्राथमिक विद्यामंदिरात दप्तर वाटप

पाचोरा प्राथमिक विद्यामंदिरात दप्तर वाटप

पाचोरा (प्रतिनिधी) –
येथील विवेक वर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था पाचोरा यांचेतर्फे प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली, पाचोरा येथील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. विवेक वर्धिनी पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या कार्यक्रम प्रसंगी भा.ज.पा. तालुकाध्यक्ष युवानेते अमोलभाऊ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कै. माणिकराजे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी माणिकराजे ट्रस्टचे सचिव ॲड. योगेश पाटील, संचालक प्रा.रवींद्र चव्हाण, विवेक वर्धिनी पतसंस्थेचे व्यवस्थापक धर्मेश अग्रवाल, गिरणाई पतसंस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, कन्या विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, पतसंस्थेचे कर्मचारी सतीश जाधव, अमोल शिंदे यांचे स्वीय सहाय्यक सिद्धांत पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी विवेक वर्धिनी पतसंस्थेतर्फे प्राथमिक विद्यामंदिरातील 90 मुला-मुलींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे विद्यालयातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अमोलभाऊ शिंदे यांनी छान छान गोष्टी सांगून मुलांशी हितगुज केले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी. एल. कुंभार यांनी प्रास्ताविक व आभार प्रकटन केले. ज्येष्ठ शिक्षक आर.ओ. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमराज पाटील, विजय पाटील, अभिषेक लांडगे, कल्पना पाटील, मनीषा चव्हाण, प्रणाली टोणपे, दांडेकर मॅडम व राकेश पगार यांनी परिश्रम घेतले.