असहाय्य तानाजीला देवदुतांच्या निस्वार्थ मदतीने जीवदान

असहाय्य तानाजीला देवदुतांच्या निस्वार्थ मदतीने जीवदान….!

पाचोरा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार✒️

असहाय्य तानाजीला देवदुतांच्या निस्वार्थ मदतीने जीवदान
भडगाव पाचोरा-भडगाव तालुक्यातील बांबरुड(बुद्रूक)येथील रहीवाशी पीडीत तानाजी मालजी कोळी या समाजाच्या बांधवाला नासिक जिल्ह्यातील सिन्नर औद्योगिक वसाहतीत कामगार ठेकेदार समाधान विष्णू तटाणे रा. सिन्नर यांच्या मार्फत सिन्नर येथील मँक फार्मा बी ५१ दिनांक २१/१२/२०२१ रोजी या कंपनीत ठेकेदारीमार्फत शेडला वेल्डींगचे काम करत असताना अचानक पंचवीस ते तीस फुटावरुन 11हजार व्हाॅल्टच्या मेन लाईन च्या तारेवर सीडी टच होऊन सदर वेंडरचे काम करत असलेले तानाजी कोळी या बांधवाच्या अंगावर उष्ण असा विज गुलाला उडुन त्याची छाती मान,हात,पोट असे जवळ-जववळ ६०/०० टक्के भाजले गेले होते. त्यावेळी ठेकेदाराने त्यांना नाशिक येथील शताब्दी हाँस्पिटल येथे अँडमीट करून चालू पुरता इलाज केला, तेथील खर्च जास्त असल्याने या पेशंटला व नातेवाईकांना विश्वासत न घेता त्यांनी पुणे येथील ससुन हाँस्पिटल येथे घेऊन जाण्याचा निर्णय त्यांनी परस्पर घेतला, हे गरीब माणसे त्याच्या भरवशावर पुणे येथे गेले पण त्यांची तेथेही गैरसोय झाली,तरी त्यांनी तेथे हालाखीचे दिवस काढून त्या पिडीत मुलाजवळ आई आणि त्याची पत्नी तेथेच उपाशी राहुन त्याचा दवाखाना केला परंतु त्याला त्याची जखम बरी होतच नव्हती मग त्यांनी तेथून डिसचार्ज घेऊन डायरेक्ट घरी आले तर तेथे राहुन त्यांनी धुळे, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे इलाज केला पण दुसऱ्यांकडून हात उसनवारी पैसे घेऊन त्याचा इलाज चालू होता. असे करता-करता एके दिवशी ते भडगाव येथील आपल्या समाजाचे सामाजिक कार्यकर्ते कोळी महासंघाचे भडगाव तालुका अध्यक्ष आण्णा कोळी यांच्याकडे गेले, त्यांनी आण्णांना सर्व हकीकत सांगितली आणि आणांनी लगेच मला फोन केला, मी नेमका त्यादिवशी कामानिमित्त मुंबईला जात होतो. तरी आण्णांना मी सांगितले की मला डिटेल्स द्या, माझ्या पध्दतीने काय करता येईल ते करेन. आणि चमत्कारच झाला या घटनेला १० महिने उलटले असतांना सुध्दा मी आणि माझा सहकारी कोळी महासंघाचे युवा शहराध्यक्ष नितीनजी शेवरे आम्ही ठरवले की काहीही झाले तरी या पीडीत ग्रृहस्थाला न्याय मिळवून देऊ. मग आम्ही महाराष्ट्र दुर्घटना ग्रस्त कामगार संघटनाचे प्रतिनिधी कैलास मोरे यांची भेट घेऊन कामगार उपायुक्त यांची भेट घेऊन रितसर फिर्याद नोंदवून लगेच चार -पाच दिवसात बोलावणे आले आणि पीडीत तानाजी कोळीला फोन करून बोलावून घेतलं आणि बोलनी करुन जखम ओली असल्या कारणाने आणि मान सरळ नसल्याने त्याला पहीले दवाखान्यात दाखल केले आणि दिवाळीच्या आधी त्याचे मानेचे आँपरेशन झाले, तब्येत चांगली झाल्यावर नंतर कामगार उपायुक्त बरोबर ठेकेदार, कंपनी व्यवस्थापन, कैलास मोरे, नितीन शेवरे,पिडीत तानाजी कोळी, त्याची आई आणि मी अशी बैठक झाली. त्यात पिडीत तानाजी कोळी याचा पुर्ण दवाखान्याचा खर्च सहीत त्याला कायम स्वरूपी कामगार म्हणून जबाबदारी ही कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केली. त्यांची विचारपूस तसेच सांत्वनासाठी नाशिक मधील आपले समाजाचे नाशिक कोळी महासंघाचे शहराध्यक्ष व समाजासाठी सतत निस्वार्थीपणाने धावुन येणारे समाजसेवक मा. श्री.युवराजजी सैंदाणे, आदरणीय श्री. नितिन दादा शेवरे,तसेच श्री कैलास भाऊ मोरे यांनी या पिडीत तरुणासाठी निस्वार्थपणे सहकार्य केले,,, व सदर पिडीत तरुणावर व त्यांच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळल्या सारखे झाले अश्या परिस्थितीत पुढील संघर्षासाठी ह्या समाज बांधवांनी संघर्ष करत सामना केला त्यावर आपल्या समाजाच्या त्या देवरुप बांधवांनी त्यांची बाजू उचलत ते कंपनीच्या ठेकेदाराला तसेच कंपनीशी संघर्ष सुरू करत त्यांना दवाखान्यात खुप सहकार्य केले,तसेच त्या पिडीत बांधवास त्या कंपनीत पर्मनंट नौकरीवर रुजु करण्यासाठी मदत केली खरच त्यांनी पिडीत कुटुंबास सतत निस्वार्थी पणाने न्याय मिळुन दिला त्यांचे पाचोरा-भडगाव तालुक्यातील समाज बांधवांकडुन खुप खुप धन्यवाद त्यासाठी भडगाव कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री आण्णा रघुनाथ कोळी, जेष्ठ समाजसेवक प्रा.सुरेश कोळी सर, श्री.समाधान कोळी, आणि पाचोरा येथुन आपले श्री पि.के.आण्णा सोनवणेचे कनिष्ठ चिरंजीव श्री गजानन (बापुभाऊ) सोनवणे श्री.विजयजी बागुल(माजी सैनिक),आदिवासी वाल्मिकीलव्य सेनेचे शहराध्यक्ष,श्री.ज्ञानेश्वर बोरसे, तसेच पत्रकार श्री.राजेंद्र खैरनार यांनी बांबरुड पिडीत बांधवांवर कसे वाईट प्रसंग ऐकुन पाचोरा व भडगावातील बांधव जसे सुन्न होऊन गेले,व त्यांचे डोळे सुद्धा पानावले, भडगावचे अण्णा कोळी यांनी पाचोराचे समाज बांधवांना बोलावून तालुक्यातील बांबरुड येथील पीडित कुटुंबाची भेट आज दिनांक १७/११/२०२२ ला घेऊन नाशिक येथील श्री.युवराज जी सैंदाणे व त्यांच्या समाजाच्या मित्रगृप पदाधिकारी सदस्यांनी तानाजी कोळी या तरुणाला कश्या प्रकारे अप्रतिम सहकार्य केले त्याबद्दल आभार मानले तसेच लोहटारच्या कै अमोल कोळी या समाज बांधव तरुणांवर दैवाने घाला घातला आणि दुर्दैवाने तो आपल्यात नाही, पण अशीच वाईट घटना घडुन ते बांधव दगावले गेले त्यावेळी सुध्दा कैलासभाऊ मोरे यांच्या सहकार्याने मध्य रात्रीपर्यंत त्यांच्या पदरात फुल नाही तर फुलाची पाकळी पाडून दिली. त्यावेळीसुध्दा नाशिकच्या या बांधवांनी असेच सहकार्य केले होते.या सर्व दैवी देवदुताचे भडगाव पाचोरा कोळी महासंघाचे वतीने शतशः आभार व असेच श्री युवराज सैंदाणे जी सारखे “देवरुप” व त्यांचे सहकारी “देवरुप” प्रत्येक ग्रामिण, तालुक्यात, जिल्ह्यात लाभले पाहिजे आज ते तानाजी सुखरुप आहेत व त्यांचे पुढील भवितव्य पण पर्मंनंट नौकरी रुजु होऊन उज्वल झाले आहे,,,,