जिल्ह्यात 21 जून ते 1 जुलै दरम्यान कृषि संजीवनी मोहिमेचे आयोजन

जिल्ह्यात 21 जून ते 1 जुलै दरम्यान
कृषि संजीवनी मोहिमेचे आयोजन

जळगाव, दि. 10 – जिल्ह्यात 21 जून ते 1 जुलै, 2021 या कालावधीत कृषि संजिवनी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत गाव बैठका, शिवार भेटींचे व शेतीशाळांचे आयोजन करण्यात येणार असून गावात शेतकऱ्यांनी कृषिविषयक राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेटी देण्यात येणार असून या कालावधीत दररोज ऑनलाईन चर्चासत्र, मार्गदर्शनपर व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात 21 जून रोजी बि.बि.एफ लागवड तंत्रज्ञान (रुंद वरबा सरी तंत्रज्ञान), 22 जून रोजी बीज प्रक्रिया, 23 जून रोजी जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, 24 जून रोजी कापूस-एक गाव, एक वाण, 25 जून रोजी विकेल ते पिकेल, 28 जून रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, 29 जून रोजी तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बॅकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, 30 जून रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना या कार्यक्रमांचे आयोजन करुन 1 जुलै, 2021 रोजी कृषि दिन साजरा करुन या मोहिमेचा समारोप होणार आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यानी सहभागी व्हावे. असे आवाहनही श्री. ठाकूर यांनी केले आहे.