के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत परिसर मुलाखती संपन्न

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत परिसर मुलाखती संपन्न

 

जळगांव के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत परिसर मुलाखती संपन्न :—- खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत व्यवस्थापन विभागातर्फे परिसर मुलाखतीचें आयोजन करण्यात आले होते . त्यात टेक महेंद्रा प्रा.ली. पुणे यांचे विद्यमाने मुलाखती घेण्यात आल्या .जिल्ह्यातून विविध शाखेच्या 180 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या . त्यात 20 विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांचे कौशल्य ,सवांद ,वाचन, लेखन ,तांत्रिक माहिती या घटकांद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी निवड झालेल्या विदयार्थ्यांचे कौतुक केले .