चोपडा महाविद्यालयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

चोपडा महाविद्यालयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व ग्रंथालय विभागातर्फे दि.१५ नोव्हेंबर, २०२२ ‘आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती’ साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.व्ही.आर.कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे, सौ.एम.टी.शिंदे, डॉ.आर.आर.पाटील, श्री.वाय. एन.पाटील आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक प्राध्यापक डॉ. एम.एल.भुसारे यांनी आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी ते म्हणाले की, आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी अतोनात प्रयत्न केले. इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात छोटा नागपूर क्षेत्रात लढा उभारला. इंग्रजांनी लादलेल्या कराविरोधात बंड पुकारले.आदिवासींच्या न्याय व हक्कासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे’.
या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘बिरसा मुंडा हे आदिवासी क्रांतिकारक आणि लोकनायक होते. बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध लढे उभारून आदिवासींना न्याय व हक्क मिळवून दिले.उलगुलान चळवळ उभी केली. विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या कार्याची ओळख वाचनाद्वारे करून घ्यावी व त्यांच्या कार्याचा, आदर्श तत्वांचा अवलंब करावा.’
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ.व्ही.आर.कांबळे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.एस.एस.बोरसे, श्री.शशी चौधरी, श्री.पी.जे.बेहेरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर बंधू-भगिनी उपस्थित होते.