घोटन येथे धर्मनाथ बीजकिर्तन महोत्सव व नवनाथ भक्तीसार पारायण सोहळ्याचे आयोजन

घोटन येथे धर्मनाथ बीजकिर्तन महोत्सव व नवनाथ भक्तीसार पारायण सोहळ्याचे आयोजन !

(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) नगर जिल्ह्यातील ‌ शेवगाव तालुक्यातील घोटण येथे स्व.आश्रू गंगाराम निकम यांच्या प्रेरणेने व हे.भ.प.रामहरी महाराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली दि.४ते११फेब्रुवारी या कालावधीत धर्मनाथ बीजकिर्तन महोत्सव व नवनाथ भक्तीसार पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व ह.भ.प.विलास महाराज गेजगे, मच्छिंद्र महाराज निकम, एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, निलेश महाराज कोरडे, पांडुरंग महाराज गीरी, विशाल महाराज खोले, चंद्रकांत महाराज खळेकर,यांची किर्तने होणार आहेत.ह.भ.प.रामराव महाराज घनवट यांच्या सुमधुर आवाजात भावार्थ रामायण दररोज सायंकाळी ३ते५ या वेळेत होणार आहे.शनिवार दि.१०/२/२४रोजी सायंकाळी पाच वाजता दिंडी प्रदक्षिणा कार्यक्रम होईल.मुंबई दुरदर्शनचे कलाकार, राष्ट्रीय प्रबोधनकार,भारुड सम्राट हमिद अमिन सय्यद यांचा रंगीत संगीत भजनाचा कार्यक्रम होईल.रविवार दि.११फेब्रुवारी२०२४ रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत किर्तन केसरी हे.भ.प.अक्रुर महाराज साखरे यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि महाप्रसादानंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे.तरी घोटण पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परमार्थाचा लाभ घ्यावा असे आवाहन घोटण ग्रामस्थ व पंच मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.