मुस्लिम समाज बहुउद्देशीय मंडळ पाचोरा तर्फे मा. पोलीस निरीक्षक यांना निवेदन

मुस्लिम समाज बहुउद्देशीय मंडळ पाचोरा तर्फे मा. पोलीस निरीक्षक सौ. पोलीस स्टेशन पाचोरा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव, यांना आज 11/09/2019 रोजी याबाबत निवेदन देण्यात आले या, निवेदनात साबिया शमीम सैफी रा. संगम विहार दिल्ली, ही मुलगी दिल्ली सिव्हिल डिफेन्स विभागातील दिल्ली (दक्षिण) कार्यालय येथे नोकरीस होती, अतिशय व्यस्त अवस्थेत क्रूरपणे हत्या केलेला तिचा मृतदेह सरजकुंड दिल्ली येथे आढळून आला होता, या घटनेतील मुख्य आरोपीला अटक झालेली आहे, परंतु सोशल मीडियावर व न्युज मध्ये प्रसारित झालेल्या माहितीवरून या क्रूर हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे, मयत मुलगी ही फक्त 21 वर्षाची होती, व ती नुकत्याच चार महिन्यांपूर्वी नोकरीवर हजर झाली होती, मीडिया व न्यूज च्या माध्यमातून प्रसारित झालेली माहिती अशी की तिचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केले व तिची क्रूरपणे हत्या केली गेली, तिच्या चेहऱ्यावर 50 पेक्षा जास्त चाकूच्या जखमा होत्या, तिची छाती कापून टाकण्यात आलेली होती, आणि शरीर विकृत अवस्थेत होते, मानव जातीला अशोभनीय असा हा गुन्हा अतिशय क्रूर पणाचा कळस गाठणारा आहे, या गुन्ह्याची दिल्ली येथे एफआय आर नोंदविली गेली आहे, तरी आम्ही या निवेदनाद्वारे मी मागणी करतो की या गुन्ह्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, सदर केस ही फास्ट-ट्रॅक कोर्टात व डे टु डे चालविण्यात यावी, गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, क्रूरपणे हत्या झालेल्या सिव्हिल डिफेन्स विभागातील अभ्यासही तिच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, तरी सदर निवेदन आपल्या मार्फत संबंधित वरिष्ठ कार्यालयाला पुढील कारवाईसाठी पाठविण्यात यावे, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे, प्रत माहितीस्तव उपविभागीय अधिकारी पाचोरा, तहसीलदार पाचोरा यांना पोच करण्यात आली आहे,
निवेदनावर सहिद शब्बीर शेख, जमील खान बशीर खान, सय्यद गफार सय्यद शेख, सलीम शेख नईम, हमीद खान राजे खान शब्बीर खान, आरिफ खान शरिफ खान, शेख नदीम शेख नसीर, अनिस खालिक शेख, सलीम शहा सुभान शहा, मेहमूद आमद खान, शेख जावेद शेख फरीद, शेख शकील शेख लाल, मुस्ताक शब्बीर मलिक, ईसा शेख अतीच, शेख शरीफ सादिक आदींच्या सह्या निवेदनावर आहेत,