संजीवनी महिला मंच आयोजित दिवाळी महोत्सवाचे आमंत्रण

संजीवनी महिला मंच आयोजित दिवाळी महोत्सवाचे आमंत्रण

पाचोरा– येथील सामाजिक कार्य तत्पर महिला -भगिनींनी एकत्र येत संजीवनी महिला मंचची स्थापना केली आहे. याद्वारे *”संजीवनी दिवाळी महोत्सव”* आयोजित करण्यात आला असून पाचोरा येथील जनतेला दिवाळी महोत्सवाचे जाहीर आमंत्रण दिले आहे.

*दिनांक 17 ऑक्टोंबर 2022, सोमवार रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्वामी लॉन्स भडगाव रोड पाचोरा येथे हा दिवाळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे*

या दिवाळी महोत्सवात दिवाळीचा उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी लागणारे सर्व सजावटीचे साहित्य, दिवाळीचा फराळ, कपडे, ज्वेलरी, यासह आनंदोत्सवात उपयुक्त असलेले सर्व पदार्थ व वस्तू एकाच छताखाली मिळणार आहेत. बाजारभावापेक्षा वाजवी दर व विशेष सूट या दिवाळी खरेदीवर प्राप्त होणार आहे. दिवाळीची संपूर्ण खरेदी एकाच ठिकाणी करण्याची सुवर्णसंधी या दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून पाचोरेकरांना प्राप्त झालेली आहे.

विशेष म्हणजे या दिवाळी महोत्सवात स्वतःचा स्टॉल लावण्याची संधीही होतकरू भगिनींना प्राप्त झालेली आहे. या दिवाळी महोत्सवात स्वतःचा स्टॉल बुक करण्यासाठी ललिता पाटील -99 22 09 28 96, संगीता वाणी -79 72 44 63 59, व ज्योती चौधरी -92 84 37 40 04 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन संजीवनी महिला मंच यांनी केले आहे.