सलग दुसऱ्या वर्षी चंदन विश्वासराव पवार यांचे सेट परीक्षेत सुयश

सलग दुसऱ्या वर्षी चंदन विश्वासराव पवार यांचे सेट परीक्षेत सुयश

चोपडा: तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगांव बु. ता. चोपडा येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले चंदन विश्वासराव पवार हे सलग दुसऱ्या वर्षी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) अंतर्गत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मार्फत दिनांक २६ मार्च २०२३ रोजी सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी (MH-SET) घेण्यात आली होती. या परीक्षेत चंदन पवार शिक्षणशास्त्र या विषयासाठी पात्र ठरले आहेत. त्यांना GS पेपर क्रमांक १ मध्ये ६२ तर शिक्षणशास्त्र पेपर क्रमांक २ मध्ये १०२ असे एकूण १६४ गुण मिळवून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी ते मराठी या विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण (पात्र) झाले होते. चंदन विश्वासराव पवार हे उत्तम शिक्षक व साहित्यिक देखील आहेत. सन २०२० मध्ये त्यांचा “शिवबा” हा काव्यसंग्रह आणि जानेवारी २०२२ मध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित “शिवछत्रपती”( खंड-पहिला) ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. एक उत्तम शिक्षक, साहित्यिक असलेल्या श्री. चंदन पवार यांनी सलग दुसऱ्या वर्षी “सेट” परीक्षेतील सुयशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.