पि.टी.सी. संस्थेचे मा. अध्यक्ष माजी आमदार लोकनेते, कै . आप्पासाहेब ओ. ना.वाघ यांच्या दहाव्या स्मृती दिना निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

पि.टी.सी. संस्थेचे मा. अध्यक्ष माजी आमदार लोकनेते, कै . आप्पासाहेब ओ. ना.वाघ यांच्या दहाव्या स्मृती दिना निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

पाचोरा ( प्रतिनिधी)
श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा या ठिकाणी आप्पा साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अनेक स्पर्धाही आयोजित करण्यात आले आणि या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला तांत्रिक विभागाचे चेअरमन . वासुदेव महाजन .मुख्याध्यापिका सौ . प्रमिला वाघ .यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. रंगभरण चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, कराटे प्रात्यक्षिक, स्लो सायकलींग , रनिंग लिंबू चमचा, गीत गायन अशा अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले .बक्षीस वितरण प्रसंगी उप मुख्याध्यापक एन. आर .ठाकरे. पर्यवेक्षक आर. एल. पाटील , ए बी. अहिरे. अजय सिनकर टेक्निकल विभाग प्रमुख एस. एन. पाटील .
एम बी बाविस्कर तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते