पाचोरा मराठा सेवा संघ पाचोरा तालुका अध्यक्षपदी सुनील पाटील( सर ) यांची निवड

आज दि. 24 सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघ व इतर 23 कक्षांचा जनसंवाद दौऱ्या दरम्यान पाचोरा येथे दुपारी 4 वाजता केंद्रीय कार्यकारिणीची मीटिंग आढावा बैठक शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे संपन्न झाले दौऱ्या दरम्यान केंद्रीय कार्यकारणी प्रदेश कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ महाराष्ट्र प्रा. शिवश्री अर्जुन तनपुरे साहेब व विभागीय अध्यक्ष शिवश्री दीपक भदाणे साहेब यांच्या अध्यक्ष मीटिंग घेण्यात आले मीटिंगच्या सुरुवातीस राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून जिजाऊ वंदनेने सुरुवात करण्यात आली व मीटिंगमध्ये सुनील रामलाल पाटील यांची मराठा सेवा संघ पाचोरा तालुका अध्यक्षपदी अर्जुन तनपुरे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली यावेळी मराठा सेवा संघाचे जेष्ठ शिवश्री राजेंद्र भोसले, माजी तालुकाध्यक्ष एन. आर. ठाकरे सर, सुनील पाटील सर, संजय पाटील सर, संभाजी ब्रिगेड विद्यार्थ्या आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकेश तुपे, संभाजी ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश देशमुख, संजय पाटील सर, प्रदीप वाघ सर, नितीन पाटील सर, किशोर पाटील, संदीप मराठे, सचिन भोसले, सर व इतर आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते