महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाचोरा पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले व नीपाने गावातील घटनेच्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाचोरा पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले व नीपाने गावातील घटनेच्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली

दोन तीन दिवसापूर्वी तालुक्यातील निपाने गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली असून एका दलित वृद्ध महिलेच्या प्रेताला जाण्यास गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील गावाचे सरपंच व इतर काही लोकांनी विरोध केला त्यामुळे संबंधित नातेवाईकांनी सदर महिलेचे प्रेत स्मशानभूमीच्या बाहेर भर पावसात जाळले सदर घटना ही अतिशय वेदना देणारी असून अशा घटनांमुळे शरमेने मान खाली जाते एका लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारचे कृत्य घडणे हे निश्चितपणे निषेधार्य आहे जी व्यक्ती देवाची खोटी शपथ घेऊ शकते त्या व्यक्तीकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवणे मुळात चुकीचे असल्याचे त्यांच्या या कृत्यावरून सिद्ध होते पाचोरा पोलीस स्टेशनला संबंधित आरोपी ं विरोधात विविध कलमान प्रमाणे गुन्हे दाखल असून आजही आरोपी मोकाटपणे गावात फिरताना निदर्शनास आढळून आले याचा अर्थ संबंधित आरोपींना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते सदर आरोपी हे सत्ताधारी पक्षाचे असून माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील हे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष असल्याने आरोपींना अटके पासून अभय मिळत आहे संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी व कडक शासन व्हावे जेणेकरून समाजामध्ये अशा वाईट प्रवृत्ती भविष्यात निर्माण होणार नाहीत अशी मागणी करीत आहोत अन्यथा मनसे तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष ऋषिकेश भोई, उपशहर अध्यक्ष यश रोकडे व रोहित पाटील, शहर सरचिटणीस श्रीकृष्ण दुंदुले प्रशांत पाटील, जितेंद्र नाईक,अमोल म्हस्के, वाल्मीक जगताप, पवन पाटील,आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते