पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायती’च्या पोटनिवडणुकीत भाजप’चे वर्चस्व
युवानेते अमोलभाऊ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करायला झाली सुरूवात – पोट निवडणुकीच्या निकालावरून झाला श्रीगणेशा
१८ जागांपैकी १० जागांवर भाजप’ने मारली बाजी- १ जागा अपक्ष
शिवसेना व राष्ट्रवादी’साठी आगामी पाचोरा-भडगाव नगरपालिका निवडणुकीसाठी धोक्याची घंटा
पाचोरा प्रतिनिधी : ” यह तो ट्रेलर है – पिक्चर अभी बाकी है ” असं म्हणत भाजप तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी यांना सुरूंग लावत तब्बल १८ जागांपैकी १० जागांवर भाजप’चा झेंडा रोवत पाचोरा तालुक्यातील जनता अमोल भाऊ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करायला सुरुवात केली आहे ? हे पोटनिवडणुकीतील निवडणुकांच्या निकालानंतर वाटत आहे व अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
१८ पैकी १० जागांवर विजय हा शिवसेना व राष्ट्रवादी पक्षांसाठी चिंतेचा विषय असून आगामी होऊ घातलेल्या पाचोरा – भडगाव नगरपालिका’साठी धक्का आहे.
*एकाप्रकारे आगामी निवडणुकीत सर्व टक्कर काट्याची होईल असे या निवडणुकीतुन दाखवण्याचा प्रयत्न अमोल भाऊ शिंदे यांचा आहे.*
*” अभी नहीं तो कभी नहीं “* हि ताकद व लक्ष्य डोळ्यात ठेऊन दिवसं रात्र मेहनत घेऊन सर्व पुर्वतयारी आणि नियोजन सुरू झाल्याने यांचा इफेक्ट पोटनिवडणुकीच्या निवडणुकीतुन जाणवत आहे.
भाजप’ तालुकाध्यक्ष युवानेते अमोल शिंदे यांचे नेतृत्व मान्य करायला जनतेने सुरूवात केली असुन आगामी नगरपालिका सह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी हि शिवसेना व राष्ट्रवादी’साठी धोक्याची घंटा आहे.
पोट निवडणुकीचा निकाल हा ट्रेलर आहे – पिक्चर अजुन बाकी आहे की काय ? अशी चर्चा पाचोरा शहरात या थंडीच्या वातावरणात गरमागरम ऐकायला मिळत आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी या पोट निवडणुकी’च्या निकालानंतर काय स्पष्टीकरण देते किंवा कसे बघते ? याकडे जनतेसह राजकीय जाणकारांचे लक्ष लागुन राहिल.