सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे चेअरमन नानासो.संजय ओंकार वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण

🌈पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे चेअरमन नानासो.संजय ओंकार वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी 🇮🇳तिरंग्याला🇮🇳 सलामी देत सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकलीत. प्रसंगी शालेय समिती चेअरमन बापूसाहेब.जगदीश पंडितराव सोनार,शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर,शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.निंबा पाटील सर,श्री.सिताराम पाटील सर,श्री शेख सर,शाळेचे समन्वयक श्री. एस.डी.पाटील सर,माजी उपशिक्षक श्री.भिकन पाटील सर,श्री.सुरेश पाटील सर,श्री.अभिमन्यू पाटील सर, माजी शिक्षिका श्रीमती.इंदुबाई टोके मॅडम,सौ.सुनंदा सोनवणे मॅडम,श्री.नारायण सोनवणे सर उपस्थित होते.शाळेतील सहशिक्षक श्री.अभिजीत महालपुरे सर यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. ध्वजसंचलन श्री.स्वप्निल माने सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ईश्वर पाटील सर श्री.अभिजीत महालपुरे सर यांनी तर आभार मा. मुख्याध्यापक यांनी मानले.ध्वजारोहणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.