अनिल महाजन यांनी आज मुंबई येथे एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मानले आभार

अनिल महाजन यांनी आज मुंबई येथे एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मानले आभार

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे नेते ,माजी मंत्री नाथाभाऊ खडसे यांची ए.एम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांनी आज मुबंई येथील निवासस्थान पंकज महल येथे झाली भेट . पाचोरा बाजार समिती येथे कृषि मेळावा घेणे बाबत ही चर्चा झाली कोरोनाची परिस्थिती बघून कृषी मेळावाचे आयोजन करा मी नक्की येईल असे यावेळी नाथाभाऊ यांनी सांगितले.

नाथाभाऊ यांनी अनिल महाजन यांचे अभिनंदन केले यांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातही संघटनात्मक बांधणी साठी जास्त लक्ष द्यावे अशा सूचना केल्या.अनिलजी माझा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहे.असे यावेळी नाथाभाऊ यांनी आवर्जून सांगितले आणि पाचोरा -भडगाव व पारोळा – एरंडोल येथील जनते सोबत माझ जून नात आहे. तुह्मी चिंता करू नका.योग्य वेळी योग्य विषय घडवूया असे यावेळी नाथाभाऊ यांनी अनिल महाजन यांना ह्या भेटी दरम्यान सांगितले.