सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रात गगनभरारी हीच अस्मिताताई पाटील यांच्या यशाची गुरुकिल्ली

सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रात गगनभरारी हीच अस्मिताताई पाटील यांच्या यशाची गुरुकिल्ली…
उत्तुंग कामगिरी करत आई वडिलांचे नाव उंचविले….

पाचोरा तालुक्यातील एक छोटेसे खेडे वडगाव टेक असून त्या छोट्याशा खेड्यातील सौ अस्मिताताई पाटील यांनी त्या गावाचे नाव लौकिक केले असून त्यांनी राजकारण, समाजकारण व शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवून महिलाही कुठल्याही क्षेत्रात मागे नसून काम करण्याची जिद्द,धमक आणि सर्व गोष्टीशी मुकाबला करण्याची शक्ती म्हणजे नारीशक्ती!
सौ अस्मिताताई पाटील यांच्यात हाच खंबीरपणा असून त्या एक अत्यंत हुशार व बुद्धिवान असून महिला वर्गाला पुढे नेण्याकरता सदैव प्रयत्न करीत असतात. त्यांचे शिक्षण अकरावी ते एफ वाय बी एस सी पर्यंत पाचोरा कॉलेजला झाले असून पुढील शिक्षण त्यांनी अमळनेर येथील नावाजलेले प्रताप कॉलेज येथे व जळगाव येथील एम जे कॉलेज येथे घेतले. त्यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे नंतर त्यांनी एम एस सी पुणे येथे केले. त्यांनी पीएचडी मराठवाडा येथे केली असून त्या एक उच्च शिक्षित असून सुसंस्कृत घराण्यातील आहेत.त्यांचे वडील स्वर्गीय श्री एडवोकेट एच एन पाटील पाचोरा शहरात एक सुप्रसिद्ध वकील म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध होते. एडवोकेट श्री एच एन पाटील यांना चार मुली त्या मध्ये सहिता जळगांव अस्मिता पाटील जळगाव , ज्ञानदा अमरावती तर वैशाली पेन येथे राहतात तसेच त्यांना दोन मुलं असून अद्वैत पाटील बिल्डर असून श्री निकित पाटील ब्रोकर आहेत. यामध्ये सौ अस्मिताताई मोठ्या असून त्यांनी जबाबदारी घेऊन आपल्या शिक्षणाचा पूर्णपणे अभ्यास करून त्यांनी समाजकारण व राजकारण तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करून तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवले आहे. त्यांनी आपला राजकारणाचा प्रभाव निर्माण केला असून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना अनेक महत्त्वाची पदे भूषवली. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून अनेक मोठे मोठे पदे भूषविली. त्यामध्ये भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जळगाव ग्रामीण महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजिका *बेटी बचाव बेटी पढाव* अभियान उत्तर महाराष्ट्र संयोजिका *पंडित दीनदयाल उपाध्यक्ष* प्रशिक्षण अभियान प्रवक्ता चर्चा प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश विविध पदावर सदस्य *महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग* महाराष्ट्र राज्य ग्रंथालय नियोजन समिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अभ्यास मंडळ वनस्पतीशास्त्र व पर्यावरण शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य समन्वयिका *महिला बचत गट अध्यक्ष* जळगाव जिल्हा सिनिअर्स बॅडमिंटन असोशियन प्रदेश सदस्य बेटी बचाव बेटी पढाव अभियान भाजपा *संचालिका*:- पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक पाचोरा जिल्हा जळगाव प्राध्यापिका सलग २५ वर्ष कार्यरत नूतन मराठा महाविद्यालय जळगाव क्रीडा व इतर उपक्रमात सहभाग सदस्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान *नाशिक रोटरी क्लब सदस्य* पाचोरा भडगाव सदस्य *गोल्डन क्लब* जळगाव तसेच समाज कारणावर मुख्य भर राजकारणा सोबत समाजकारणात व शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याचा सातत्याने भर तसेच *पाचोरा येथे त्यांनी एक स्वतःचे कॉलेज स्थापन करून त्या कॉलेजला आई वडिलांचे नाव देऊन आई-वडिलांचा नावाचा उद्धार केला. * सौ.अस्मिताताई यांनी अनेक चांगले चांगले उपक्रम घेतले. महिला वर्गाकरिता त्यांनी *साडी वाटपाचा कार्यक्रम* व सुसंवाद साधून महिलांना जनजागृती निर्माण करणे महिलांनी जास्त जास्त शैक्षणिक क्षेत्रात राजकारणात व समाजकारणात भर द्यावी महिलांनी पुढाकार घेऊन आम्हीही महिला कुठल्या क्षेत्रात कमी नाही या विषयावर मार्गदर्शन करणे . सौ अस्मिताताई पाटील यांनी आपल्या आई वडिलांची *आठवण म्हणून वडिलांचे नाव डीएड कॉलेजला दिले तसेच आईचे नाव बी एड कॉलेजला दिल* असून त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी शिकत आहेत. सौ अस्मिताताई पाटील यांचे पती *श्री नित्यानंद पाटील* एक मोठे बिझनेसमॅन असून त्यांची स्वतःची शेती असून ती बागायतदार शेती फळबाग असून त्यामध्ये आंबा मोसंबी सिताफळ पेरू असे अनेक उत्पादक घेऊन शेतामध्ये स्वतः लक्ष देऊन उत्तम प्रकारे शेती करतात व सौ अस्मिता ताई पाटील या त्यांना नेहमी मदत करीत असतात व राजकारण समाजकारण शैक्षणिक क्षेत्र यावरही आपल्या लक्ष केंद्रित करून आपले कार्य करीत असतात. शिक्षण क्षेत्रात KG पासून ते PG पर्यंत अनेक कमिटी मध्ये काम केलें. पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक देशात जाऊन काम करत आहे. आपले कार्य करीत असताना त्यांना सध्या येणाऱ्या निवडणुकीत बांबरुड कुरंगी गटात *महिला आरक्षण किंवा जनरल* निघाले तर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी असून सध्या त्यांचा पक्ष हा गुलदस्त्यात आहे. ऐनवेळी त्या निर्णय घेऊन सर्वांना धक्का देऊन निवडणूक जिंकण्या करता प्रयत्न करतील.त्यांच्या मागे महिलावर्ग व युवा वर्ग असून त्या एक अभ्यासू राजकारणी असून निवडणुकीत बाजी मारतील अशी अपेक्षा आहे.