नांद्रा येथील भाचे अभिजीत पाटील आय. ए. एस. उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न

नांद्रा येथील भाचे अभिजीत पाटील आय. ए. एस. उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न

नांद्रा ता. पाचोरा येथील कै. नथू खंडू सूर्यवंशी यांचे नातू व माधवराव नथू सूर्यवंशी यांचे भाचे अभिजीत राजेंद्र पाटील राहणार पातोंडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव हें नुकतेच यूपीएससीच्या माध्यमातून आय ए एस परीक्षा भारतातून 226 व्वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा नांद्रा गावाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कमिटी, महादेव मंदिर संस्थान, तंटामुक्ती, शिव स्मारक ग्रुप, राजे संभाजी ग्रुप,महालक्ष्मी ग्रुप,कोंबडा पुरी मित्र मंडळ, हॅपी फ्रेंड सर्कल, क्रिएटिव स्कूल तर्फे व आलेले नातेवाईक व सूर्यवंशी परिवार यांच्यातर्फे त्यांचा महादेव मंदिरा वर जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक यशवंत पवार व प्रास्ताविक महेश गवादे सर यांनी केले याप्रसंगी अभिजीत पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की मी माझे ध्यय साध्य करण्यासाठी पाच वेळा फेल झालो परंतु सहाव्या अटॅम्पला मी मात्र यशस्वी झालो,या पाच वर्षांच्या दरम्यान मी माझ्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप व फेसबुक पूर्णपणे डिअॅक्टीव केले होते,यासाठी पुणे व दिल्ली तेथे यूपीएससीचा अभ्यास केला,त्यांचे शिक्षण पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण जयहिंद हायस्कूल धुळे येथे तसेच उच्च माध्यमिक शिक्षण जयहिंद शिक्षण संस्थेचे झेड बी पाटील महाविद्यालय धुळे येथे घेतले. इयत्ता दहावी 94 टक्के आणि बारावीत 90 टक्के गुण मिळालेत. त्यांनी इयत्ता चौथी आणि सातवीला स्कॉलरशिप गुणवत्ता यादीत नंबर पटकावून शिष्यवृत्ती मिळवली होती मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील पदवी सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथून पहिला क्रमांक मिळवून घेतली इंजिनीरिंग च्या शेवटच्या वर्षी कॅम्पस प्लेसमेंट मध्ये अमेरिकन कंपनीत नोकरी मिळाल्यावर देखील ती न स्विकारता स्पर्धा परीक्षा देऊन कलेक्टर होऊन देशसेवेचा निश्चयचा चंग बांधला असल्यामुळे व युपीएससी परीक्षेची तयारी पुणे व दिल्ली येथे केली आणि मोठ्या जिद्दीने संपूर्ण भारतातून 226 वा क्रमांक पटकावून त्यांचीं जिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे तरी खानदेशातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन आपापल्या क्षेत्रांमध्ये उच्चतम यश संपादन करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले