पाचोरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी साईमत समाचारचे संपादक गणेश शिंदे यांची निवड

पाचोरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी साईमत समाचारचे संपादक गणेश शिंदे यांची निवड

पाचोरा : येथील साईमत समाचारचे संपादक व दैनिक भास्कर वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी गणेश शिंदे यांची जळगाव जिल्हा पत्रकार संघ मर्यादित पाचोरा तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पदी घोषित करण्यात आली आहे.आज २१ फेब्रुवारी २०२३ रोजी जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जाभळेकर यांच्या जयंती निमित्ताने हिरक महोत्सव आयोजित करण्यात आला हा महोत्सव जिल्हा पत्रकार भवन येथे होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधान सभेचे अध्यक्ष मा.आ. अरुणभाई गुजराथी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी पत्रकार परिषदेचे मा अध्यक्ष विजयबापु पाटील हे होते, प्रमुख उपस्थितीत जळगाव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन होते, व्यासपीठावर पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष डी गोपी सुरवाडे ग्रामीण अध्यक्ष भिका चौधरी प्रमोद पाटील निरंजन शेलार कमलाकर वाणी हे होते. या वेळी मराठी पत्रकार परिषद मुबई व जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्थ अध्यक्ष विजय पाटील यांनी पाचोरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे घोषित केले.